कोविडच्या नियमांची पायमल्ली होणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर पालिकेची करडी नजर

पनवेल : कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढल्याचे वाढलेल्या रुग्णसंख्येवरुन दिसून येत आहे. अशा परिस्थितीत पनवेल महानगरपालिकेने याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती , सदस्य यांच्यासोबत दि. २३ रोजी बैठक घेऊन बाजार समितीत कोरोनाच्या नियमाचे पण करण्याची सूचना केली आहे. याबाबत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर तत्काळ कारवाई करण्यासाठी बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर कर्मचारी देखील नियुक्त करण्यात आला आहे. 
      
उपायुक्त विठ्ठल डाके,उपायुक्त संजय शिंदे , सचिन पवार यांनी पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या मार्गदर्शानुसार हि बैठक आयोजित केली होती. या बैठकीला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राम भाईर , संचालक संतोष पाटील, संचालक मोहन कडू, संचालक सुरेश भोईर, संचालक रमाकांत गरूडे, सचिव भरत पाटील आदी उपस्थित होते .

बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांनी कोरानाचे सर्व नियम पाळणे महत्वाचे आहे. अन्यथा पालिकेच्यावतीने योग्य कारवाई करण्यात येणार असल्यायाविषयी  सूचना त्यांना देण्यात आल्या.शहरातील मच्छिबाजार समितीच्या सदस्यांशी देखील यावेळी याच विषयावरून चर्चा करण्यात आली. पालिका प्रशासन कोरोनाचे नियम पायदळी तुडविणाऱ्या नागरिकांविरोधात आक्रमक भूमिका घेत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांविरोधात तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या असल्याची माहिती उपायुक्त डाके यांनी दिली.
Comments
Popular posts
पनवेलमधील हुतात्मा स्मारक उद्यानात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदन सोहळा संपन्न...
Image
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना १०० व्या जन्मदिनानिमित शिवसेना पनवेल शहर शाखेतर्फे विनम्र अभिवादन ...
Image
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने पनवेल प्रभाग क्रं १९ मध्ये नामफलकाचे अनावरण..
Image
नितीन पाटील यांची पनवेल महानगरपालिकेतील महायुतीच्या गटनेतेपदी निवड...
Image
पनवेल महापालिका मुख्यालयात ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदन उत्साहात संपन्न...
Image