पनवेल वैभव / प्रतिनिधी :- शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर व कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून दि.२४ फेब्रुवारी रोजी कार्यक्षम रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या उपस्थितीत शेकडो खारघर व कामोठे येथील युवकांनी जाहीर पक्षप्रवेश केला.
पनवेल विधानसभा क्षेत्रातील खारघर व कामोठे शहरातील नितीन शिंदे व संदीप कराळे यांच्या सोबत शेकडो युवकांनी जाहीर प्रवेश केला.
यावेळी रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत, कार्यक्रमाचे प्रवेश आयोजक पनवेल तालुका महानगर समन्वयक गुरुनाथ पाटील, कामोठे शहरप्रमुख राकेश गोवारी, उपशहरप्रमुख संतोष गोळे, विभागप्रमुख कृष्णकांत कदम, जेष्ठ शिवसैनिक गिरीश गुप्ता, सोनार काका, सखाराम किंद्रे आदी शिवसैनिक व कार्यकर्ते उपस्थित होते.