पोलिस असल्याची बतावणी करून वडापाव विक्रेत्यास लुटले...
पोलिस असल्याची बतावणी करून वडापाव विक्रेत्यास लुटले...

पनवेल दि.१४ (वार्ताहर)- पोलिस असल्याची बतावणी करून दोन अनोळखी इसमांनी वडापाव विक्रेत्यास लुटल्याची घटना पनवेल जवळील नॅशनल हॉटेलसमोर घडली आहे.
          
दिपक जाधव (वय-३७) हे तळोजा फेज-१ मधून तळोजा गाव येथे मोटारसायकलने जात असताना दोन अनोळखी इसम मोटारसायकलीवरून त्याठिकाणी आले व त्यांनी दिपक जाधव यांची गाडी थांबवून आम्ही पोलिस आहोत, तुम्ही हेलमेट व मास्क घातला नाही असे सांगून तुम्ही गळ्यातील सोन्याची चेन काढून कागदात बांधून ठेवा असे त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवून १५ हजार रूपये किंमतीची सोन्याची चेन हातचलाखीने अज्ञात इसमाने स्वतःकडे ठेवून घेतली व कागदात दगड ठेवून तो जाधव यांच्या हाती देऊन तो तेथून पसार झाला. याबाबतची तक्रार तळोजा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments
Popular posts
दिशा महिला मंच तर्फे नवी मुंबईतील कर्तृत्ववान महिलांना "नवदुर्गा पुरस्कार" देऊन सन्मान...
Image
बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे मुंबई हायकोर्टात "ती" नावाचे पथनाट्य सादर....
Image
महाराष्ट्र पोलीसांचा सातासमुद्रापार झेंडा ; सहाय्यक पो.नि. सुभाष पुजारी यांनी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत पटकाविले ब्रॉन्झ मेडल....
Image
खांदा कॉलनी युवासेने तर्फे जेष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वाटप व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न....
Image
मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केला जागतिक शरीर सौष्ठव स्पर्धेत कांस्यपदक विजेते सुभाष पुजारी यांचा विशेष सत्कार....
Image