मगनभाई पटेल ज्वेलर्स तर्फे राम मंदिर उभारणीसाठी २ लाख १ हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द...

पनवेल / दि.४(वार्ताहर) : शहरातील मगनभाई पटेल ज्वेलर्स यांच्या तर्फे राम मंदिर उभारणीसाठी २ लाख १ हजार रुपयांचा धनादेश पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक राजू सोनी यांच्या माध्यमातून मिलींद एकनाथ मानकामे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

शहरात राम मंदिर उभारणीसाठी निधी संकलन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर, आ.प्रशांत ठाकूर व सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या आवाहनानुसार नगरसेवक राजू सोनी यांच्यामार्फत निधी संकलन सुरू आहे. शहरातील मगनभाई ज्वेलर्सचे मालक मगनभाई पटेल कुुंटुंबिय प्रतिकभाई, नवनीत भाई, वैभव भाई यांनी अयोध्या येथे राम मंदिर उभारणीसाठी राजू सोनी यांच्या माध्यमातून २ लाख १ हजाराचा धनोदश नुकताच मिलींद एकनाथ मानकामे यांच्याकडे सुपूर्द केला आहे.

फोटो : मगनभाई ज्वेलर्सचे मगनभाई पटेल व त्यांच्या कुटुंबियांच्यामार्फत धनादेश नगरसेवक राजू सोनी व मिलींद मानकामे यांच्याकडे सुपूर्द करताना.
Comments