फ्लिपकार्ट कंपनीची फसवणुक करणारी टोळी गजाआड...

कोपरखैरणे पोलीस स्टेशनला गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की , शिवाजीराव शेडगे अपार्टमेंट , सेक्टर नं . १ , घणसोली , नवी मुंबई याठिकाणी इसम नामे वाजीद शकील मोमीन हा फ्लिप कार्ट या ऑनलाईन शॉपिंग कंपनीत ऑफ लोड टीम लिडर म्हणुन नोकरीस असुन तो कंपनीतुन बनावट ग्राहकांच्या पत्यावर पार्सल मागवुन ते डिलेव्हरी बॉय कडुन ग्राहकाचा पत्ता मिळुन न आल्या नंतर त्याचे कडुन घेवुन ते घरी नेवुन त्यामधील वस्तु काढुन घेवुन बॉक्स मध्ये साबण किंवा इतर वस्तु ठेवुन बॉक्स पुन्हा पॅकिंग करून पुन्हा फ्लिपकार्ट कंपनीकडे पाठवित असल्याची माहिती मिळाली . मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्या करिता पोलीस पथकासह बातमी मिळालेल्या ठिकाणी जावुन खातरजमा केली असता वाजीद शकील मोमीन , वय २४ वर्षे , रा शिवाजीराव शेडगे अपार्टमेंट , रूम नं . ६६३ , सेक्टर नं . १ , घणसोली , नवी मुंबई यास ताब्यात घेवुन त्याची अंगझडती घेतली असता त्याचेकडे सॅमसंग कंपनीचा , अॅपल कंपनीचा आय फोन ११ हे मोबाईल मिळुन आले . मिळुन आलेल्या मोबाईलचे बिलाबाबत चौकशी केली परंतु त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली . तसेच मिळुन आलेल्या मोबाईलचे बिल दाखविण्यास असमर्थता दर्शवल्याने त्यास पोलीस ठाणे येथे आणून विश्वासात घेउन चौकशी करता त्याने त्याचे इतर साथिदार नामे १ ) संघपाल बाबुराव मोरे , वय २ ९ वर्षे , रा वेनुबाई निवास , रूम नं . १०१ , से ० ९ , दिवागाव , ऐरोली , नवी मुंबई , २ ) जयंत महादेव उगले , वय २७ वर्षे , रा पुष्प गंगा बिल्डीग , प्लॉट नं . ३६ , बी - विंग , रूम नं . २०३ , सेक्टर नं . ८ , कामोठे , नवी मुंबई यांचेसह गुन्हा केल्याची कबुली दिली आहे . सदरबाबत फ्लिप कार्ट कंपनीचे टीम लिडर प्रदिपकुमार कलपेशकुमार उपाध्याय , वय ३४ वर्षे , धंदा नोकरी , रा मंगलमुर्ती अपार्टमेंट , प्लॉट नं . २५८ , फलॅट नं . ४०१ , सेक्टर नं . ५ , सानपाडा , नवी मुंबई यांना माहिती देउन कोपरखैरणे पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्र . 1 ५ ९ / २०२१ कलम ४२० , ४०८ , ३४ भादवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन ३ आरोपींना नमुद गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे . आरोपीत यांना विश्वासात घेउन त्यांचेकडे अधिक सखोल , कौशल्यपुर्ण तपास करता त्यांचेकडुन अॅपल कंपनीचे आयफोन ६ , रिएलमी ३ , सॅमसंग ०५ , हिवो ३ , टेक्नो १ , ओप्पो -१ , कंपनीचे मोबाईल फोन , अॅपल कंपनीचा आयपॅड -१ , लिनोव्हो कंपनीचा आयपॅड -१ , अॅपल कंपनीचे घडयाळ - ३ , टायटन कंपनीचे घडयाळ – ३ , फोजील कंपनीचे घडयाळ -१ , सी.के कंपनीचे घडयाळ १ , सोनी , निकॉन कंपनीचा कॅमेरा - १ , सोनी कंपनीचा कॅमेरा - १ ट्रॅव्हलींग बॅग - २ असा एकुण रूपये ८,२४,००० / - किमीतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे . सदरची कामगिरी श्री . बिपीनकुमार सिंह , पोलीस आयुक्त साो , नवी मुंबई , डॉ . श्री . जय जाधव , सह पोलीस आयुक्त , श्री . सुरेश मेंगडे , पोलीस उप आयुक्त सो , परि -१ , वाशी , श्री . विनायक वस्त , सहा . पोलीस आयुक्त सो , वाशी विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री . प्रदीप तिदार , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , कोपरखैरणे पोलीस ठाणे , गुन्हे प्रकटिकरण पथकाचे श्री . निलेश येवले , सहा . पोलीस निरीक्षक , श्री . गणपत पवार , पोहवा / २०७५ , गणेश चौधरी , पोशि / २ ९ २८ , किरण दुधवंत , पोशि / ३२७० , गणेश गिते , पोशि / १२१३४ , निलेश निकम , पोशि / १२३४३ यांनी केली आहे .
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image