पनवेल / प्रतिनिधी
भारतीय जनता पक्ष पनवेल व प्रभाग क्रमांक 19(ब) आयोजित पाककला स्पर्धा (पनवेल शहर मर्यादीत) महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी पाककला स्पर्धा सोमवार दिनांक ८ मार्च २०२१ रोजी सायं ४ ते ६ या वेळेत महिलांसाठी आयोजित करण्यात आली आहे.
सदर स्पर्धा विविध प्रकारचे पराठे (व्हेज),
विविध प्रकारचे भात (राईस)
(व्हेज), केक. वरील पैकी कोणत्याही प्रकारच्या पदार्थासाठी सहभागी होऊ शकता.
यासाठी प्रवेश अर्ज कृपया अर्ज इंग्लिश मध्ये भरावा. https://forms.gle/Vmv6Z3z1jU7h28Cn8 नाव नोंदणीची अंतिम तारीख २५ फेब्रुवारी २०२१ आहे.
अधिक माहिती साठी संपर्क आदिती ओझे : 9930111343,
सुनीता खरे : 9969430235,
संध्या समेळ : 99698 54347 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन नगरसेविका रुचिता मुग्धा गुरुनाथ लोंढे यांनी केले आहे.
"महिला किर्तन स्पर्धा"
महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेली ही स्पर्धा फक्त २०-४० वयोगटातील महिलांसाठीच असेल.
सदर स्पर्धा दिनांक ८ मार्च २०२१ रोजी श्री विरूपाक्ष महादेव मंदिर, पनवेल येथे आयोजित करण्यात आली आहे. प्रवेश अर्ज सदर लिंकवर भरावा. https://forms.gle/9KFsJ2KFkeGsy8Ut9
अधिक माहितीसाठी संदीप लोंढे : 9320728939,
नंदकुमार कर्वे : 9869430269,
समीर ओझे : 9820698488 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन नगरसेविका रुचिता मुग्धा गुरुनाथ लोंढे यांनी केले आहे.