पनवेल, दि.१६ (वार्ताहर) :- तळोजा वाहतूक शाखा अंतर्गत रॅपिड ऍक्शन फोर्स चे दोन अधिकारी ४० जवान तळोजा शाखेकडील २ अधिकारी १२ कर्मचारी यांनी वाहतूक नियमांची जनजागृती करण्याकरिता रॅपिड ऍक्शन फोर्स कॉलनी चौक या ठिकाणाहून मोटरसायकल रॅली काढून तळोजा फेज वन, तळोजा फेज २, घोटगाव घोट कॅम्प, आय जी पी एल नाका, एमआयडीसी रोड, नावडे, तळोजा गाव या भागातून रॅलीने जाऊन मोटरसायकल चालकांनी हेल्मेट वापरणे विषयी व वाहतुकीचे नियम पाळणे विषयी पोस्टर व मेगा फोन द्वारे आवाहन करण्यात आले.
सदरची रॅली पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा पुरुषोत्तम कराड व साहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली तळोजा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक महेश पाटील पोलीस उपनिरीक्षक सावंत व रॅपिड ऍक्शन फोर्सचे असिस्टंट कमांडर संजय चोहान व त्यांचे सहकारी व तळोजा शाखेचे अंमलदार यांनी सहभागी होऊन वाहतूक नियमांविषयी जनजागृती केली . नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळून एक पाऊल अपघात मुक्त समाज व अपघात मुक्त शहर निर्मिती करण्यासाठी टाकावे असें आवाहन करण्यात आले आहे.
फोटो :- तळोजा वाहतूक शाखा व रॅपिड एक्शन फोर्सच्याद्वारे करण्यात आली वाहतूक नियमांची जनजागृती रॅली.