नगसेवक राजू सोनी यांच्या कार्याबद्दल शिवशक्ती मित्र मंडळाने केले कौतुक...

पनवेल / दि.४ (वार्ताहर) : शहरातील शिवशक्ती मित्र मंडळाने पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक राजू सोनी यांनी तात्काळ रस्त्याचे दुरुस्तीचे काम करून दिल्याबद्दल मंडळाने फलक लावून त्यांचे कौतुक केले आहे.
लाईन आळी परिसरातील रस्त्यांना खड्डे पडले होते. त्यामुळे वाहतूक कोंडी व अपघात घडत होते. याबाबत शिवशक्ती मित्र मंडळाच्या सदस्यांनी नगरसेवक राजू सोनी यांच्याशी संपर्क साधून त्यांना याबाबत माहिती दिली. तात्काळ नगरसेवक राजू सोनी यांनी विनम्र हॉटेल ते शिवशक्ती सर्कल या भागात रस्त्यांना पडलेले खड्डे सिमेंट काँक्रीटने बुजवून दिले. याबद्दल शिवशक्ती मित्र मंडळाने त्यांचे फलक लावून धन्यवाद दिले आहेत.

फोटो : फलक व रस्त्याची केलेली कामे.
Comments