तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशन आयोजित “तळोजा MIDC एक्स्पो 2023” चा समारोप...
तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशन आयोजित “तळोजा MIDC एक्स्पो 2023” चा समारोप...

पनवेल वैभव / दि.२७ (संजय कदम) : तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशन आणि एमएसएमई विकास आणि सुविधा कार्यालय यांच्या संयुक्तपणे आयोजित तळोजा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या च्या पहिल्या औद्योगिक प्रदर्शन म्हणजे “तळोजा MIDC एक्स्पो 2023” चा समारोप तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष सतीश शेट्टी, पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे यांच्यासह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच पार पडला. 
या दोन दिवशीय प्रदर्शनाला एमआयडीसी, एमपीसीबी, तळोजा वाहतूक आणि तळोजा पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह औद्योगिक कर्मचारी, शासकीय मान्यवर, महाराष्ट्रातील विविध औद्योगिक संघटनांचे समिती सदस्य, विद्यार्थी यांच्यासह हजाराहून अधिक नागरिकांनी भेट दिली.
तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशन आणि एमएसएमई विकास आणि सुविधा कार्यालय यांच्या संयुक्तपणे 24 व 25 जानेवारी दरम्यान “तळोजा MIDC एक्स्पो 2023” चे आयोजन करण्यात आले होते. एमएसएमईएसच्या विकासासाठी असलेल्या विविध सरकारी योजना, केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, झिरो डिफेक्ट झिरो इफेक्ट पद्धत, शासनामार्फत नोंदणी आणि खरेदी, शासकीय ई-मार्केट, सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी सार्वजनिक खरेदी धोरणला समर्थन या उद्देशाने तळोजा औद्योगिक वसाहतीमधील प्लॉट क्र. जे-94, एमएसईडीसिएल महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या औद्योगिक प्रदर्शनात 36 स्टॉल्स उपलब्ध होते. यामध्ये राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ, माझगाव डॉक,  गेलं इंडिया, न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, भारतीय लघु उद्योग विकास बँक, चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्री असोसिएशन, शिक्षण संस्था, विविध बँक, पर्यावरण, व्हॉल्व्ह उत्पादक, अभियांत्रिकी कंपन्या, उपकरणे, सॉफ्टवेअर/नेट तंत्रज्ञान/वाय-फाय/अँटीव्हायरस, अन्न/मसाला, सौर वित्तपुरवठा, आरोग्य प्रदाता , स्टील इंडस्ट्रीज, कोल्ड प्रेस ऑइल, विमा, रिअल इस्टेट, वायर्ड उत्पादने, पायाभूत सुविधा, पॅकिंग आणि कन्व्हेयर्स आणि केटरिंग इत्यादींचा समावेश होता. या दोन दिवशीय प्रदर्शनात एमआयडीसी, एमपीसीबी, तळोजा वाहतूक आणि तळोजा पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह हजाराहून अधिक अभ्यागत, औद्योगिक कर्मचारी, शासकीय मान्यवर, महाराष्ट्रातील विविध औद्योगिक संघटनांचे समिती सदस्य, विद्यार्थी इत्यादींनी प्रदर्शनाला भेट दिली. 


फोटो : तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशन आयोजित तळोजा MIDC एक्स्पो 2023 चा समारोप
Comments