पनवेलचे विश्वेश अविनाश सहस्रबुद्धे यांचे कंपनी सेक्रेटरी (CS) परीक्षेत उल्लेखनीय यश...
संपूर्ण भारतात १२ व्या क्रमांकाने उत्तीर्ण...
रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री भरत गोगावले याच्या हस्ते विशेष सत्कार...
पनवेल / प्रतिनिधी : -
भारतातील महत्वपूर्ण अशा कंपनी सेक्रेटरी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून संपूर्ण भारतात १२ वा क्रमांक मिळवणाऱ्या पनवेलचे सुपुत्र विश्वेश अविनाश सहस्रबुद्धे यांचा गौरव रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते करण्यात आला.
या भव्य सत्कार सोहळ्यात पालकमंत्र्यांनी विश्वेश यांच्या परिश्रम, चिकाटी आणि ध्येयवेडाचे कौतुक करताना सांगितले की, “अशा तरुणांच्या यशामुळे समाजात प्रगतीची दिशा निर्माण होते आणि राज्याच्या विकासाला नवी गती मिळते. विश्वेश यांच्या पालकांचा देखील विशेष सन्मान करून त्यांच्या योगदानाचीही दखल घेताना पालकमंत्र्यांनी सांगितले की, “पालकांच्या संस्कारांमुळेच विश्वेश आज या शिखरावर पोहोचला आहे.”
तसेच या प्रसंगी बोलताना शिवसेना पनवेल महानगरप्रमुख तथा नगरसेवक ऍड. प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांनी सांगितले कि “पनवेलकर म्हणून विश्वेशने देशभरात आपले नाव उज्ज्वल केले आहे. हे यश केवळ वैयक्तिक नाही तर संपूर्ण पनवेलकरांचे आहे. तरुणाईस अशा यशस्वी उदाहरणांमुळे नवी प्रेरणा मिळते.”
याप्रसंगी पनवेल विधानसभा संपर्कप्रमुख राजेंद्र यादव, उपजिल्हाप्रमुख परेश पाटील, महिला तालुकाप्रमुख मंदाताई जंगले, उपमहानगरप्रमुख सचिन मोरे, तालुकाप्रमुख रघुनाथ पाटील, पनवेल शहरप्रमुख प्रसाद सोनावणे, खारघर शहरप्रमुख प्रसाद परब, पनवेल शहर संघटक अभिजित साखरे, तळोजा शहर संघटक राहुल कदम, महिला उपतालुकाप्रमुख स्मिताताई भोईर, नैना सुरते, युवासेना लोकसभा अध्यक्ष पराग मोहिते, युवासेना विधानसभा संपर्कप्रमुख अभिनय सोमण, युवासेना पनवेल विधानसभा अध्यक्ष जय कुष्टे, युवासेना पनवेल शहर प्रमुख कपिल कुरघोडे, तौफिक बागवान, गुलाब बागवान, मंदार काणे यांच्यासह शिवसेना व युवासेना पनवेल महानगरचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.