एक महिन्याच्या डोकेदुखीचे उलगडले दुर्मिळ कारण ; शस्त्रक्रिया टाळत ‘एपिड्युरल ब्लड पॅच’ प्रक्रियेने रुग्णावर यशस्वी उपचार
एक महिन्याच्या डोकेदुखीचे उलगडले दुर्मिळ कारण; शस्त्रक्रिया टाळत ‘एपिड्युरल ब्लड पॅच’ प्रक्रियेने रुग्णावर यशस्वी उपचार

 

नवी मुंबई ( पनवेल वैभव )  -  : महिनाभर सतत डोकेदुखीचा त्रास होत असलेल्या 50 वर्षीय रुग्णाचे खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटल येथे दुर्मिळ आजाराचे अचूक निदान करत यशस्वी उपचार करण्यात आले. बसल्यावर किंवा उभे राहिल्यावर डोकेदुखी वाढणे आणि झोपल्यावर कमी होणे, अशी या रुग्णामध्ये प्रमुख लक्षणं दिसून आली होती. तपासणीत मानेच्या भागातून मेंदूभोवतीचे सेरेब्रोस्पायनल फ्लुइड (CSF) गळत असल्याचे निदान झाले. त्यानंतर न्यूरोलॉजी तज्ज्ञांनी शस्त्रक्रिया टाळून एपिड्युरल ब्लड पॅच प्रक्रियेने रुग्णावर यशस्वी उपचार केले.

 तळोजा येथे राहणाऱ्या ५० वर्षीय श्री मनोज गुप्ता* या रुग्णाला गेल्या एक महिन्यापासून तीव्र डोकेदुखीचा त्रास सतावत होता. रुग्णाला उभे राहिल्यावर किंवा बसल्यावर तीव्र डोकेदुखी होत होती, तर झोपल्यावर ती कमी होत होती. काही दिवसांनी मात्र ही डोकेदुखी सतत जाणवू लागली. वेदनांची तीव्रता १० पैकी ८ ते ९ इतकी होती. त्यामुळे त्याला दैनंदिन कामे करणे आणि लक्ष केंद्रित करणेही कठीण झाले होते.

मेंदूच्या स्कॅनमध्ये सबड्युरल हेमॅटोमा दिसल्याने शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आला होता. मात्र तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णाचा वैद्यकीय इतिहास, तपासणी आणि स्कॅनचा बारकाईने अभ्यास केला असता, हा रक्तसंचय डोकेदुखीचे मूळ कारण नसून, स्पायनल कॉर्डमधून सेरेब्रोस्पाइनल फ्लुइड (CSF)  गळती झाल्यामुळे मेंदूवर पडणाऱ्या ताणामुळे तो निर्माण झाला असल्याचे निदर्शनास आले. यानंतर रुग्णाची सेरेब्रोस्पाइनल फ्लुइड (CSF)  प्रेशर मॅनोमेट्री करून मेंदूतील द्रवाचा दाब अत्यंत कमी असल्याचे आढळले. पुढील तपासणीत ही गळती मानेजवळील (सर्व्हायकल स्पाईन) भागातून होत असल्याचे स्पष्ट झाले.त्यानंतर न्यूरोलॉजिस्ट डॉ. पवन ओझा आणि डॉ. सुरंजना बसाक यांच्या मार्गदर्शनाखाली 26 जून रोजी एपिड्युरल ब्लड पॅच प्रक्रिया करण्यात आली.

एपिड्युरल ब्लड पॅच या प्रक्रियेमध्ये रुग्णाचेच रक्त विशेष कॅथेटरद्वारे स्पायनल कॉर्डच्या बाहेरील एपिड्युरल स्पेसमध्ये सोडले जाते. रुग्णाला विशिष्ट ट्रेंडेलेनबर्ग पोझिशनमध्ये ठेवल्यानंतर हे रक्त मानेच्या भागापर्यंत पोहोचून सेरेब्रोस्पाइनल फ्लुइड (CSF) गळतीचे ठिकाण बंद करते.

उपचारानंतर काही तासांतच रुग्णाची डोकेदुखी लक्षणीयरीत्या कमी झाली. दुसऱ्या दिवशी वेदना १० पैकी केवळ १ ते २ इतक्या प्रमाणात दिलून आल्या आणि पुढील काही दिवसांत पूर्णपणे नाहीशा झाल्या. तसेच मेंदूतील सबड्युरल हेमॅटोमाचाही आकारही हळूहळू कमी होत असल्याचे वैद्यकीय तपासणीत दिसून आले.

 डॉ. पवन ओझा (न्यूरोलॉजिस्ट, मेडिकव्हर हॉस्पिटल, खारघर) म्हणाले, उभे राहिल्यावर वाढणारी आणि झोपल्यावर कमी होणारी डोकेदुखी ही साधी मायग्रेन किंवा ताणामुळे होणारी डोकेदुखी असेलच असे नाही. अशा लक्षणांमागे स्पॉन्टेनियस इंट्राक्रॅनियल हायपोटेन्शन (SIH) किंवा सेरेब्रोस्पाइनल फ्लुइड (CSF) झिरपण्यासारखे दुर्मिळ कारण असू शकते. वेळीच निदान आणि योग्य उपचार केल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो.

 डॉ. सुरंजना बसाक(न्यूरोलॉजिस्ट, मेडिकव्हर हॉस्पिटल, खारघर) यांनी सांगितले, सेरेब्रोस्पाइनल फ्लुइड (CSF) गळत असल्यास एपिड्युरल ब्लड पॅच ही प्रभावी उपचारपद्धती मानली जाते. यामुळे या स्रावाची गळती थांबविण्यास मदत होते आणि रुग्णाची लक्षणं वेगाने कमी होतात. सतत किंवा विशिष्ट स्थितीत वाढणाऱ्या डोकेदुखीकडे दुर्लक्ष करू नका.

दुर्मिळ न्यूरोलॉजिकल आजारांचे वेळीच निदान आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपचाराने गुंतागुंतीच्या रुग्णांनाही उत्कृष्ट उपचार पुरवता येतात. अशा रुग्णांनी पुरेसे पाणी पिणे, काही दिवस जास्त शारीरिक श्रम टाळणे, जड वजन उचलणे टाळणे, वारंवार वाकणे टाळणे आणि डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे विश्रांती घेणे आवश्यक आहे. वेळीच निदान झाल्यास या दुर्मिळ आजारावर प्रभावी उपचार शक्य असून गंभीर गुंतागुंत टाळता येऊ शकते.

 रुग्ण मनोज गुप्ता सांगितले की, तीव्र डोकेदुखीमुळे मी खुप घाबरलो होतो.जेव्हा मी खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटल्समध्ये उपचारांसाठी गेलो तेव्हा मला आशेचा किरण मिळाला आणि तिथल्या डॉक्टरांनी शस्त्रक्रिया न करता यशस्वी उपचार करत मला नवे आयुष्य मिळवून दिले. आज माझी डोकेदुखी पूर्णपणे बंद झाली असून मी निरोगी जीवन जगू शकतो आणि यासाठी मी मेडिकव्हर हॉस्पिटल्सच्या संपुर्ण टिमचे आभार मानतो.

 खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटल्सचे सेंटर हेड संदीप जोशी म्हणाले मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक निदान सुविधा आणि तज्ज्ञांच्या समन्वयातून रुग्णांना उत्तमोत्तम उपचार पुरविले जातात आणि हे प्रकरण याचे एक उदाहरण ठरले आहे.
Comments
Popular posts
पनवेल शहर वाहतूक शाखेच्या तत्परतेमुळे अपघातग्रस्त तिघांना मिळाले तात्काळ उपचार...
Image
महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आमूलाग्र बदलांचे संकेत ; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला मोठे यश...
Image
समाजकार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल कोमल मोहनिष भोईर यांना ''टॉप 30 इन्स्पायरिंग वुमन अवॉर्ड 2026'' प्रदान...
Image
पनवेलच्या सिद्धांत संजय कांबळे विद्यार्थ्याचे स्कॉटलंड सॉलिसिटर परीक्षेत घवघवीत यश...
Image
धरणे, नदीपात्रे आणि पर्यटनस्थळांवर वाढणारी गर्दी लक्षात घेवून नागरिकांनी आवश्यक ती खरबदारी घ्यावी - वपोनि गजानन घाडगे..
Image