१७ जून रोजी सुमन साळुंखे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप...
१७ जून रोजी सुमन साळुंखे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप...

पनवेल, दि.13 (वार्ताहर) ः स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन चे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी आपल्या मातोश्री सुमन साळुंखे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम 17 जून 2026 रोजी राजीप प्राथमिक शाळा वडघर येथे आयोजित केलेले आहे.  

या कार्यक्रमाचे आयोजन पनवेल तालुका अध्यक्ष प्रशांत सोनावणे व पनवेल महानगरपालिका अध्यक्ष निलेश कांबळे यांनी आयोजित केलेला आहे. दरवर्षी महेश साळुंखे हे पनवेल येथील गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत व्हावी म्हणून मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम करत असतात . त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी सुद्धा 17 जून 2026 रोजी महेश साळुंखे आपल्या आईच्या स्मरणार्थ मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम घेणार आहेत.  हा कार्यक्रम रायगड जिल्हा परिषदेच्या वडघर येथील प्राथमिक मराठी शाळेमध्ये होणार आहे.


फोटो ः सुमन साळुंखे
Comments