केडिऐजीबी ग्रुप आणि ओरायन मॉलच्या रक्तदान शिबीराला ऊदंड प्रतिसाद ; २०५ पनवेलकरांनी केले रक्तदान ...
केडिऐजीबी ग्रुप आणि ओरायन मॉलच्या रक्तदान शिबीराला ऊदंड प्रतिसाद ; २०५ पनवेलकरांनी केले रक्तदान 

पनवेल दि. ०८ ( वार्ताहर ) :  ओरायन मॉल पनवेल येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. याचे ऊद्धाटन  डॉक्टर निलेश बांठिया यांच्या हस्ते पार पडले. ऊद्धाटन प्रसंगी जेष्ठ डॉक्टर गिरीश गुणे आणि डॉक्टर ययाती गांधी उपस्थित होते. प्रसिद्ध ऊद्योगपती व केडिऐजीबी संस्थे चे अध्यक्ष मंगेश परुळेकर आणि उपाअध्यक्ष राजश्री नाईक यांनी सर्व मांन्यवरांचे स्वागत केले. 
                          या प्रसंगी रक्तदान शिबीराचे सहयोगी आय.डब्लुसी ग्यालेक्सी न्यु पनवेल चे प्रेसिडेंट भुमिका परमार व सेक्रेटरी दिपा आडमुठे या उपस्थित होत्या. डॉक्टर निलेश बांठिया यांनी स्वता रक्तदान करुन शिबीराचा शुभारंभ केला. या प्रसंगी बोलतांना डॉक्टर निलेश बांठिया यांनी रक्ताचा तुटवडा असतांना रक्तदान शिबीर आयोजित केल्या बद्दल आयोजकांना धंन्यवाद दिले आणि जास्तीत जास्त लोकांनी या शिबारात रक्तदान करावे असे आहवान केले. डॉक्टर गिरीश गुणे यांनी ओरायन मॉल चे हे रक्तदान शिबीराचे तिसरे वर्ष आहे, ऐप्रिल, मे ला दर वर्षी रक्तदान शिबीरांचे आयोजन तुरळक प्रमाणात असल्या मुळे दर वर्षी या महिन्यात रक्ताचा तुटवडा असतो, या वर्षी आयोजकांनी २०० युनीट रक्ता संकलनाचे टारगेट ठेवले आहे त्याना शुभेच्छा देऊन लोकांनीही रक्तदान करावे असे अहवान केले. डॉक्टर ययाति गांधी यांनी आयोजकांचे अभिनंदन केले तसेच रक्त हे काही झाडावर येत नाही ऐखाद्या माणसाने रक्त दिले तरच ते दुसऱ्या गरजु माणसाला मिळु शकते यात प्रत्येकाने मला किंवा माझ्या आप्तांना कधीतरी रक्ताची गरज पडु शकते म्हणुन मी आज माझे रक्त देईन हा विचार करुन रक्तदान करावे असे आव्हान केले. एम.जी.एम हॉस्पिटल कामोठे रक्तपेढी चे प्रमुख राजेश अत्तरडे यांनी तुमच्या या आजच्या रक्तदान शिबीराला  महत्व फार आहे कारण रक्ताच्या तुटवड्या मुळे आमच्या हॉस्पिटल मधे थ्यालासिमीया ची २२० मुले, ह्रदय शस्त्रक्रीया चे पेशंट रक्ता च्या वेटींग मधे आहेत , आजच्या रक्तदान शिबीरा मुळे गरजुं गरीबांना रक्त उपलब्ध  होणार आहे, त्या बद्दल तुम्हाला धंन्यवाद द्यावे तेवढे कमीच आहेत असे सांगीतले रक्तदान शिबीराला ऊपस्थिती राहुन डॉक्टर भगवान बिरमुळे यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच मंडळाच्या कार्यकर्तानी दिलेल्या आग्रहाच्या आमंत्रण वरुन  नगरसेविका सौ स्नेहल ढमाले ऊपस्थित राहिल्या  मंगेश परुळेकर यांनी त्याचे स्वागत केले. पनवेल मधील व्यवसायिक  प्रशांत पोद्दार व संजय पोद्दार तसेच मुंबई हुन गौडब्राम्हण संस्थे चे महेश रहाळकर, सिंधुदुर्ग मंडळ चे अध्यक्ष  केशव राणे , प्रल्हाद साटम. ऍड नागेश हिरवे हे ऊपस्थित राहुन रक्तदान केले. होते. रक्तदान शिबीरा मध्ये २६० रक्तदात्यांनी भाग धेतला तरी प्रत्यक्ष २०५ रक्तदात्यांना रक्तदान करता आले. सदर रक्तदान शिबीराचे आय. डब्लुसी ग्यालेक्सी न्यु पनवेल यांच्या सहयोगाने आणि ऐम.जी. ऐम हॉस्पिटल कामोठे. यांच्या सहकार्याने पार पडले. अध्यक्ष  मंगेश परुळेकर यांनी २०५ युनीट विक्रमी रक्तदाना बद्दल पनवेलकरांचे आभार मानले.फोटो - रक्तदान शिबीर
Comments