१५ ऑगस्ट पर्यंत मराठी शिकणे सक्तीचे, नंतर कार्यवाही
पनवेल / प्रतिनिधी - :
महाराष्ट्रात मराठी भाषा सक्तीची या शासनाच्या नियमानुसार राज्यातील अमराठी भाषिक रिक्षाचालकांना मराठी शिकता यावे यासाठी राज्यभर मराठी शिकवणी वर्गाचे प्रारंभ सुरू झाले आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग पनवेल, कोकण मराठी साहित्य परिषद शाखा पनवेल व सुधागड विद्या संकुल कळंबोली यांच्या संयुक्त विद्यमाने कळंबोलीतील सुधागड विद्या संकुलात अमराठी रिक्षाचालकांसाठी मराठी शिकवणी वर्गाच्या प्रारंभाचे उद्घाटन सोमवारी सकाळी करण्यात आले.
यावेळी मोठ्या संख्येने रिक्षाचालक उपस्थित होते. अमराठी रिक्षाचालकांना 15 ऑगस्ट पर्यंत मराठी शिकून त्याची परीक्षा देऊन त्याचे प्रमाणपत्र मिळवणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानंतर मात्र परिवहन विभागाकडून सक्तीची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे पनवेल परिवहन विभागातील सहाय्यक परिवहन अधिकारी सुरज पवार यांनी सांगितले आहे.
पनवेल परिवहन विभागातील अमराठी चालकांना मराठी भाषा शिकून त्याचे प्रमाणपत्र मिळवण्याची कार्यशाळा कळंबोलीतील सुधागड विद्या संकुलात सोमवारी सकाळी पार पडली. या शिकवणी वर्गाच्या प्रारंभासाठी पनवेल परिवहन विभागातील सहाय्यक परिवहन अधिकारी सुरज पवार, सौरभ सोनवणे, अनिल पांढरे,कोकण मराठी साहित्य परिषदेचे नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी, पनवेल शाखेचे अध्यक्ष सुभाष कुडके, संजय गोडसे, रिक्षा चालकांना प्रबोधन करण्यासाठी ऍड सुयश प्रधान, नितळ वढावकर, विद्या प्रभू, सुधागड विद्या संकुलातील उपप्राचार्य धर्मेंद्र दीक्षित यांच्यासह मोठ्या संख्येने रिक्षाचालक उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना ऍड सुयश प्रधान यांनी सांगितले की अमराठी भाषिक ज्यांना मराठी अजिबात येत नाही, त्यांच्यासाठी 15 ऑगस्ट पर्यंत मराठी भाषा शिकवणीचे वर्ग परिवहन विभागाकडून घेण्यात येणार आहेत. तसे पाहता तब्बल 200 पानांचे शासनाने निर्गमित केलेले पुस्तक असून त्यातील अभ्यास हा रिक्षा चालकांना करायचा आहे.परंतु एवढा अभ्यास करणे शक्य नसल्याने त्यातील फक्त 16 मुद्दे प्रमुख हे शिकवले जाणार असून ते चार भागात चार-चार ओळीचे संभाषण हे रिक्षा चालकांना शिकवले जाणार व त्यानंतर त्यांची परीक्षा घेऊन त्यांना डिजिटल पद्धतीचे प्रमाणपत्र ही दिले जाणार आहे.यासाठी चारही वर्गांना संबंधित रिक्षा चालकाने हजर राहणे सक्तीचे आहे.या चार शिकवणी वर्गामध्ये विविध प्रकारची चार-चार वाक्य दैनंदिन जीवनात वापरली जाणारे मुद्दे शिकवले जाणार आहे. ती फक्त त्यांनी तोंडी अधिकाऱ्यांना परीक्षेच्या वेळी सांगावयाची आहेत.अत्यंत सोप्या पद्धतीची वाक्य ही मराठी भाषेतील शिकवली जाणार असून त्याचा दैनंदिन जीवनामध्ये रिक्षा चालक व ग्राहकांमध्ये वापर होणार आहे. त्यामुळे होणारे गैरसमज वादविवाद भविष्यात टाळता येणार आहेत. सदरचे प्रशिक्षण हे पूर्णपणे मोफत असून प्रशिक्षणाचा कालावधी 15 ऑगस्ट पर्यंतच सीमित आहे. त्यानंतर प्रशिक्षणाला येणाऱ्या रिक्षा चालकांना त्याची शासनाची फी भरणे सक्तीचे होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मराठी रिक्षाचालक बांधव आहेत त्यांनी परिवहन विभागाच्या या सवलतीचा व शिकवणी वर्गाचा फायदा घेऊन मराठी शिकल्याचे प्रमाणपत्र घेऊन ते आपल्या रिक्षामध्ये लावायचे आहे असे यावेळी सांगण्यात आले.
चौकट
महाराष्ट्र राज्य परिवहन विभागातर्फे अमराठी भाषिक रिक्षाचालकांना तसेच परप्रांतीय परमिट धारक रिक्षा चालकांना मराठी येणे बंधनकारक आहे. यासाठी परिवहन विभाग व कोकण साहित्य मराठी परिषद यांच्या संयुक्त विद्यामाने मराठी शिकवणीचे मोफत वर्गाचे आयोजन शासनाकडून करण्यात आले आहे.रिक्षा चालकांच्या विविध संघटनांनी आपल्या आजूबाजूच्या व आपल्या संघटनेतील अमराठी रिक्षा चालक बांधवांना याची माहिती देऊन जास्तीत जास्त संख्येने अमराठी बांधवांना मराठी शिकता यावे यासाठी शासनाच्या या मराठी शिकवणी वर्गाचा संधीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 15 ऑगस्ट 2026 पर्यंत जर आपण मराठी भाषा अवगत केली नाही तर त्यानंतर सक्तीने त्याची कार्यवाही करून दंडात्मक रित्या परिवहन विभागाकडून कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.तरी जास्तीत जास्त अमराठी रिक्षाचालक बांधवांनी मराठी भाषा सोप्या पद्धतीने शिकून त्याचे प्रमाणपत्र अवगत करण्यात चे आवाहन करण्यात येत आहे.
सुरज पवार,

सहाय्यक परिवहन अधिकारी पनवेल रायगड.