नगरसेवक दशरथ म्हात्रे यांच्या पुढाकारातून ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप...
नगरसेवक दशरथ म्हात्रे यांच्या पुढाकारातून ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप

पनवेल /खांदा कॉलनी प्रतिनिधी : -
भारतीय जनता पक्षाच्या वतीने खांदा कॉलनी येथील खांदेश्वर परिसरात ज्येष्ठ नागरिकांसाठी छत्री वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीचा विचार करून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमाला पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन(भाई) पाटील, खांदा कॉलनीचे नगरसेवक एकनाथ (दादा) गायकवाड, भाजपा युनियन लीडर मोतीराम कोळी, भाजपा नेते मुंडे साहेब, उद्योजक सुरेश म्हात्रे, बिल्डर संजय पाटील प्रसन्ना, जयंती प्रसन्ना, गोपीनाथ मुंडे, आशा मुंडे, प्रमोद भोईर, रामनाथ पाटील, सुभाष गावडे, दत्ता कुळकर्णी, केबीसी चे महेन्द्र कांबळे, प्रकाश जाधव, अनिल पालवे, शिवाजी खताळ, आझाद जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष कृष्णा पाटील, जेष्ठ नागरिक कट्टा ग्रुप, मी उपनगराध्यक्ष गणेश पाटील, संजय कांबळे,प्रविण भोसले, सचिन गायकवाड, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
खांदेश्वर मंदिर परिसर हा खांदा कॉलनीतील ज्येष्ठ नागरिकांसाठी एक महत्त्वाचे केंद्र मानले जाते. दररोज सकाळी येथे शेकडो ज्येष्ठ नागरिक योगाभ्यास, व्यायाम आणि प्रातःभ्रमणासाठी एकत्र येतात. तसेच विविध महिला संघटनांतील ज्येष्ठ महिलांनीही या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.
कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे परिसरातील नियमितपणे मंदिर परिसरात येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना प्रत्यक्ष भेटून त्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. उपस्थित नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक करत आयोजकांचे आभार मानले.
भाजपा नगरसेवक दशरथ म्हात्रे यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून हा छत्री वाटप कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. समाजातील ज्येष्ठ नागरिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
Comments