शिवसेना नगरसेवक रामदास शेवाळे यांच्या वाढदिवसानिमित्त कळंबोलीत भव्य रोजगार मेळावा, तरुणांना मिळाला रोजगार...
शिवसेना नगरसेवक रामदास शेवाळे यांच्या वाढदिवसानिमित्त कळंबोलीत भव्य रोजगार मेळावा, तरुणांना मिळाला रोजगार...

कळंबोली / प्रतिनिधी  -  : शिवसेना जिल्हाप्रमुख, नगरसेवक रामदास शेवाळे यांच्या वाढदिवसानिमित्त कळंबोली येथे भव्य रोजगार व मोफत कोर्सेस मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. वाढदिवसानिमित्त शेकडो बेरोजगार व नव तरुणांना विविध कंपन्यांतून तात्काळ रोजगार उपलब्ध झाल्याने रोजगार मेळाव्यातील तरुण-तरुणींनी रामदास शेवाळे यांचे आभार मानून त्यांना धन्यवाद दिले. माझा वाढदिवस हा सगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा व्हावा यांना वाढदिवसाच्या दिवशीच तरुणांना त्यांच्या शिक्षणाानुसार नोकरी उपलब्ध व्हावी यासारखा आनंदाचा दिवस माझ्या जीवनात नसल्याचे आवर्जून यावेळी रामदास शेवाळे यांनी सांगितले आहे.
         शिवसेना शिंदे गटाचे पनवेल जिल्हाप्रमुख व पनवेल महापालिकेतील नगरसेवक रामदास शेवाळे यांचे साठाव्या वाढदिवसानिमित्त कळंबोलीतील सुधागड विद्यालयात भव्य रोजगार मेळावा व मोफत विविध कोर्सेस चे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर, पनवेलचे महापौर नितीन पाटील, स्थायी समिती सभापती बबन मुकादम, नगरसेवक रवींद्र भगत, शहराध्यक्ष तुकाराम सरक यांच्यासह सामाजिक, शैक्षणिक,राजकीय, सांस्कृतिक आणि सार्वजनिक विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.मेळाव्यात नवी मुंबई आणि परिसरातील 100 हून अधिक नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदवून विविध क्षेत्रांतील रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. हजारो युवक-युवतींनी उपस्थित राहून नोकरीसाठी अर्ज दाखल केले होते.
    या सामाजिक उपक्रमाला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी रामदास शेवाळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत युवकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या रोजगार मेळाव्याचे कौतुक केले. रोजगाराच्या वाढत्या संधी युवकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. मेळाव्यात नोकरीच्या संधींसोबतच विविध मोफत कौशल्यविकास अभ्यासक्रमांची माहिती आणि करिअर मार्गदर्शनही उपलब्ध करून देण्यात आले. उपस्थित युवकांनी या उपक्रमाचे स्वागत करत आयोजकांचे आभार मानले. रामदास शेवाळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित हा सामाजिक उपक्रम युवकांना रोजगाराच्या दिशेने नवी संधी उपलब्ध करून देणारा ठरला असून परिसरात त्याचे सर्वत्र स्वागत होत आहे. वाढदिवसानिमित्त रोजगार मेळाव्याचे आयोजन तन्मय रामदास शेवाळे यांनी केले होते. 
Comments