खारघर नोडमधील ११५ झोपड्या, १२ व्यावसायिक स्टॉल जमीनदोस्त...
खारघर नोडमधील ११५ झोपड्या, १२ व्यावसायिक स्टॉल जमीनदोस्त


पनवेल दि . २९ ( वार्ताहर ) :  खारघर नोडमध्ये वाढत्या अनधिकृत बांधकामांविरोधात सिडकोने धडक कारवाई करत तब्बल ११५ झोपड्या, १२ व्यावसायिक स्टॉल तसेच पत्र्याचे अनधिकृत कंपाऊंड निष्कासित केले. सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने ही कारवाई केली.
                           कारवाईदरम्यान सेक्टर ८ मधील अंदाजे २००० चौरस मीटर क्षेत्रावरील ४० झोपड्या हटविल्या. तर सेक्टर ११ येथे अंदाजे ४००० चौरस चौरस क्षेत्रावरील सेक्टर ३६ मधील भूखंड क्रमांक ५ए वरील ५०० चौरस मीटर क्षेत्रफळावर उभारलेले पत्र्याचे अनधिकृत कंपाऊंड जमीनदोस्त करण्यात आले. त्याच परिसरातील १२ अनधिकृत व्यावसायिक स्टॉलदेखील हटविण्यात आले.
फोटो -  अनधिकृत बांधकामांविरोधात सिडकोची धडक कारवाई
Comments