चालत्या मोटर सायकलवरून महिलांचा विनयभंग करणाऱ्या विकृत इसमास अटक
पनवेल ,दि.२९ ( संजय कदम ) : चालत्या मोटर सायकलवरून महिलांचा विनयभंग करणाऱ्या विकृत इसमास रबाळे पोलिसांनी अटक केली आहे .
एक २२ वर्षीय तरुणी तिच्या मैत्रिणीच्या घरी जात असताना सेलिब्रेशन बिल्डिंगच्या मागील गेटसमोर, सेक्टर 06, ऐरोली, येथे आल्या असता आरोपीने त्याच्याजवळ असलेल्या बर्गमन कंपनीच्या पांढऱ्या रंगाच्या स्कुटीवरून फिर्यादीचा पाठलाग करून त्यांच्या विनयभंग करण्याच्या उद्देशाने त्यांच्या पाठीमागील पार्श्वभाग पकडून दाबून तेथून पळ काढला. त्यानंतर फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून सदर गुन्हा दाखल करण्यात आला व त्यानुसार वपोनि बाळकृष्ण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन गवळी (गुन्हे) व पोलीस निरीक्षक श्याम बनसोडे (प्रशासन) यांच्यासह सपोनि अविनाश पाळदे,पोउनि राहुल गरड,पोहवा दर्शन कटके, पो हवा वायंगणकर, पोहवा मयूर सोनवणे, पोशि मनोज देडे व पोशि यादवराव घुले या पथकाने गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळावरील प्राथमिक माहिती घेतली. घटनास्थळाचे प्राप्त सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास तसेच गुप्त बातमीदारामार्फत आरोपीचा शोध घेऊन आरोपी कृष्णा महेंद्र कनोजिया, वय 21 यास ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
फोटो - आरोपींसह पोलिसांचे पथक