नवी मुंबईत न्यूईरा हॉस्पिटलच्या आधुनिक ट्रॉमा केअर सेंटरचा शुभारंभ....
रस्ते सुरक्षेला चालना देण्यासाठी हॉस्पिटलतर्फे नवी मुंबई पोलिसांना २०० बॅरीकेट्सचे वितरण...
नवी मुंबई / (पनवेल वैभव) - : रस्ते अपघातातील जखमींवर गोल्डन अवरमध्ये प्राण वाचविणारी उपचार यंत्रणा म्हणजेच ट्रॉमा केअर सेंटर हे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी खूप गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेता वाशीच्या न्यूईरा हॉस्पिटलने नव्याने एक पॅाली ट्रॉमा केअर सेंटर सुरू केले आहे. उपचारासाठी होणारा विलंब कमी करण्यासाठी आणि त्वरित उपचार मिळवून देण्यासाठी हे केंद्र सज्ज असून यामुळे रुग्णांना योग्य वेळी योग्य उपचार मिळण्यास मदत होते.
*सेंटरच्या शुभारंभ प्रसंगी श्री. संजय येनपुरे – आयपीएस, सह पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी डॉ. संजय धार (संचालक, ऑर्थोपेडिक्स विभाग),डॉ. विनोद विज (प्लास्टिक आणि कॉस्मेटिक सर्जन),डॉ. सुनील कुट्टी( न्युरोसर्जन),डॉ. चंद्रशेखर टी(क्रिटिकल केअर मेडिसिन),डॉ. मनीष पेंडसे (फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्ट),डॉ. निशांत तावडे(इंटरनल मेडिसिन एक्स्पर्ट),डॉ. राम खरे(जीआय, लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक सर्जरी),न्यूईरा हॉस्पिटलचे उपाध्यक्ष आणि सीईओ डॉ. माताप्रसाद बी गुप्ता उपस्थित होते.*
याठिकाणी Triage (ट्रायज) ही आपत्कालीन स्थितीत रुग्णांच्या स्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांना प्राधान्यक्रमाने उपचार देण्याची वैद्यकीय प्रक्रिया उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अपघात, स्ट्रोक, गंभीर दुखापतींसारख्या प्रकरणांमधील रुग्णाला सर्वात आधी प्राधान्य दिले जाते आणि प्रतीक्षा न करता त्यांचे व्यवस्थापन केले जाते. या केंद्राला चोवीस तास उपलब्ध असलेल्या प्रशिक्षित आपत्कालीन पथकाचे, तसेच अस्थिरोग, सर्जन, मज्जासंस्थेच्या शस्त्रक्रिया, भूलविकार तज्ज्ञ, अतिदक्षता विभाग आणि फिजिओथेरपी तज्ञांचा समावेश आहे.
शहरातील वाढत्या वाहतूक व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर रस्ते सुरक्षेला चालना देण्यासाठी न्यूईरा हॉस्पिटलतर्फे नवी मुंबई पोलिसांना २०० बॅरीकेट्स देण्यात आले.वाशी पोलीस ठाण्यात आयोजित कार्यक्रमात वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकऱ यांच्या उपस्थितीत हे बॅरीकेट्स सुपूर्द करण्यात आले. यावेळी संबंधित अधिकारी व रुग्णालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते. वाहतूक नियंत्रण अधिक प्रभावी करण्यासाठी आणि रस्त्यांवरील शिस्त राखण्यासाठी या बॅरीकेट्सचा उपयोग केला दाणार आहे.
*डॉ. सुनील कुट्टी (संचालक, न्यूरोसर्जन- ब्रेन ॲण्ड स्पाईन, न्युईरा हॉस्पिटल) म्हणाले,* आपत्कालीन परिस्थितीत, रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय बऱ्याचदा अतिशय तणावाखाली असतात. अशावेळी वेळ व दवडता उपचार त्वरित सुरू व्हावेत आणि ते सुरळीतपणे दिले जावेत, हे सुनिश्चित करणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. ट्रॉमा केअर सेंटरची रचना रुग्णांचे त्वरित मूल्यांकन करणे, त्यांच्या स्थितीनुसार उपचारांना प्राधान्य देणे आणि वेळीच उपचार करणे या उद्देशाने केली आहे. या दृष्टिकोनामुळे केवळ वैद्यकीय परिणामच सुधारत नाहीत, तर कठीण प्रसंगी कुटुंबांना मोठा दिलासाही मिळतो.
*डॉ. संजय धर(संचालक, अस्थिरोग विभाग) सांगतात की,* अपघातातील उपचार म्हणजे केवळ तात्काळ उपचार नसून, रुग्ण लवकर पुर्वपदावर यावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे. अशावेळी विविध विभागातील तज्ज्ञांना एकाच प्रकरणात एकत्र काम करावे लागते आणि यात उत्तम समन्वय साधणे खूप महत्त्वाची भूमिका बजावते. आपत्कालीन प्रक्रियांपासून ते अतिदक्षता विभाग आणि पुनर्वसनापर्यंत, आम्ही रुग्णांना त्यांच्या पुर्वपादवर येणाच्या प्रवासात आधार देतो.
*न्यूईरा हॉस्पिटलचे उपाध्यक्ष आणि सीईओ डॉ. माताप्रसाद बी गुप्ता म्हणाले,* आणीबाणीच्या प्रसंगी रुग्णांसाठी एक विश्वासार्ह आधार व्यवस्था निर्माण करण्यास आम्ही सज्ज आहोत. याठिकाणी रुग्णांना कोणत्याही गोल्डन अवरमध्ये उपचार मिळतील. हे ‘ट्रॉमा केअर सेंटर’ रुग्णांना दिलासा,पुरेपुर आराम, सुरक्षितता आणि आजारातून लवकर बरे करण्याची शाश्वती देते.