करंजाडे स्मशानभूमी येथे खासदार निधीतुन होणार विकासकामे
शिवसेना उप तालुकाप्रमुख गायकवाड यांच्या पाठपुराव्याला यश
पनवेल/प्रतिनिधी -- करंजाडे येथील स्मशानभूमी येथे सुविधा देण्याबाबत शिवसेना उप तालुकाप्रमुख गौरव गायकवाड यांच्या पाठपुराव्यानुसार खासदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रम अंतर्गत विकास कामे केली जाणार आहेत.
सिडकोने वसाहत निर्माण करीत असताना नागरी सुविधा देणे महत्वाचे आहे. सिडकोच्या दुर्लक्षमुळे स्थानिक नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागतं आहे. येथील स्मशानभूमी येथे दशक्रिया विधी शेड तसेच बैठक व्यवस्था व्हावी यासाठी करंजाडे येथील शिवसेना उप तालुकाप्रमुख गौरव गायकवाड यांनी खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करीत होते. यावेळी खा बारणे यांनी या कामाला खासदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रम अंतर्गत निधीतून १५.०० लक्ष इतका निधी मंजूर केला आहे. याबाबतचे पत्र रायगड जिल्हाधिकारी यांना पाठविले आहे. त्याचबरोबर पत्र माऊली घोगरे यांनी रघुनाथ पाटील तालुका प्रमुख यांच्या समावेश गौरव सुरेश गायकवाड यांच्या कडे सुपूर्त केला व लवकरच कामाला सुरुवात होणार आहे.