महापौर नितीन पाटील यांचा समाजाभिमुख निर्णय ; मानधन व भत्ते ‘महापौर सहाय्यता निधी’त करणार जमा..
महापौर नितीन पाटील यांचा समाजाभिमुख निर्णय ; मानधन व भत्ते ‘महापौर सहाय्यता निधी’त करणार जमा

पनवेल वैभव / दि.०९ (संजय कदम) : समाजहित आणि नागरिकांच्या आरोग्याप्रती आपली कटिबद्धता जपत पनवेल महानगरपालिकेचे नवनिर्वाचित महापौर नितीन पाटील यांनी एक अत्यंत आदर्शवत आणि महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. महापौर पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर, आपल्याला मिळणारे सर्व प्रकारचे मानधन आणि भत्ते 'महापौर सहाय्यता निधी'मध्ये जमा करण्याचा निर्णय त्यांनी घेतला असून, या निर्णयाचे सर्व स्तरांतून उत्स्फूर्त स्वागत आणि कौतुक होत आहे. 
एका जबाबदार लोकप्रतिनिधीने अशा प्रकारे स्वतःच्या हक्काच्या मानधनाचा त्याग करून तो निधी समाजकार्यासाठी खर्च करणे, हा पनवेलमधील एक नवा आणि स्तुत्य पायंडा मानला जात आहे. महापौर नितीन पाटील यांनी स्पष्ट केले की, महानगरपालिका अधिनियमान्वये महापौरांना मिळणारे प्रतिमाह मानधन, बैठक भत्ता, स्वीय सहायकाचे मानधन आणि वाहन भत्ता ही सर्व रक्कम आता थेट 'महापौर सहाय्यता निधी'त वर्ग केली जाणार आहे. हा निर्णय घेण्यामागे केवळ आणि केवळ समाजहित हाच मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले. विशेषतः गोरगरीब नागरिकांना भेडसावणाऱ्या आरोग्यविषयक समस्या आणि इतर आपत्कालीन परिस्थितीत त्यांना तातडीने आर्थिक दिलासा मिळावा, या उदात्त हेतूने त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
फोटो : नितीन पाटील
Comments
Popular posts
पनवेल महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या वतीने नितीन गावंड यांचा अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल...
Image
पनवेल महानगरपालिकेत भाजप महायुतीचे पाच स्विकृत नगरसेवक ...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या औचित्याने ७५ निराधार ज्येष्ठ नागरिकांना पनवेल तालुका विकास पत्रकार मंचाच्या वतीने मायेची उब ...
Image
स्वीकृत नगरसेवक पदी प्रथमेश सोमण यांच्या नावावर शिक्कामोर्तब...
Image