कळंबोली मध्ये महिला दिनानिमित्त आरोग्य शिबिर ...
कळंबोली मध्ये महिला दिनानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन


पनवेल, दि.7 (वार्ताहर) ः  आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने कळंबोली येथे सर्वसाधारण आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी शेकडो महिला रुग्णांची तपासणी करण्यात आली. विशेष म्हणजे या शिबिरात महिलांचे प्रमाण लक्षणीय असल्याचे दिसून आले.
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री तसेच शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी महिला दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रभर समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित करण्याचे आदेश दिले होते. त्यांच्या आदेशानुसार कळंबोली येथे महिला दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.
या शिबिरात रक्तदाब, मधुमेह, कान-नाक-घसा तपासणी, डोळ्यांची तपासणी तसेच संपूर्ण शरीर तपासणी करण्यात आली. 
खारघर, नवी मुंबई येथील मेडिकल हॉस्पिटलच्या मुख्य डॉक्टरांसह सुमारे १० जणांच्या वैद्यकीय पथकाने नागरिकांची सविस्तर तपासणी केली. तसेच आवश्यक ते आरोग्य मार्गदर्शनही देण्यात आले. या शिबिरात जवळपास शेकडो  रुग्णांची तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये महिलांचे प्रमाण अधिक असल्याची माहिती डॉ. मृणाल आमले यांनी दिली. 
तपासणीनंतर डॉक्टरांनी नागरिकांना संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि वेळोवेळी आरोग्य तपासणी करण्याबाबत मार्गदर्शन केले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व नगरसेवक रामदास शेवाळे तसेच नगरसेविका सायली सरक यांच्या मार्गदर्शनाखाली हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. 
यावेळी रामदास शेवाळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत महिलांच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. या उपक्रमामुळे परिसरातील अनेक महिलांना आणि नागरिकांना मोफत आरोग्य तपासणीचा लाभ मिळाला. कार्यक्रमास स्थानिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



फोटो ः आरोग्य तपासणी शिबीर
Comments
Popular posts
मिस्टर इंडिया फायनल' मध्ये झळकणार पनवेलचा भूमीपुत्र ब्रुशद मेटांगे....
Image
पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या १०० व्या शैक्षणिक परिषदेचे (CME) हॉटेल ताज विवान्ता येथे दिमाखदार आयोजन...
Image
कळंबोली परिसरातील कचरा व ड्रेनेज समस्येवर तात्काळ कारवाई ; नगरसेवक रामदास शेवाळे यांचे नागरिकांकडून कौतुक...
Image
महिलांच्या आरोग्य सुरक्षेसाठी ममता प्रितम म्हात्रे सक्रिय – पनवेलमध्ये कर्करोग प्रतिबंध मोहिमेला वेग...
Image
अनुसूचित जाती-जमाती महिलांप्रमाणे ओबीसी महिलांनाही स्वतंत्र प्रतिनिधित्व द्यावे ; काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांची मागणी...
Image