ओरियन मॉलमध्ये पोलिसांचा मॉकड्रिल आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याची रंगीत तालीम...
ओरियन मॉलमध्ये पोलिसांचा मॉकड्रिल आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याची रंगीत तालीम


पनवेल दि. २४ ( वार्ताहर ) :  पनवेल शहरातील ओरियन मॉल येथे आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्याच्या दृष्टीने व्यापक मॉकड्रिलचे आयोजन करण्यात आले. संभाव्य दहशतवादी हल्ला, आग किंवा अन्य आपत्तीजन्य परिस्थितीत समन्वय साधत तत्काळ प्रतिसाद देण्याची क्षमता तपासण्यासाठी ही रंगीत तालीम घेण्यात आल्याचे या वेळी सांगण्यात आले.
                        हे मॉकड्रिल पनवेल शहर पोलीस ठाणे यांच्या पुढाकाराने घेण्यात आले. यात वपोनि. नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली २ पोलीस निरीक्षक, ८ अंमलदार, बीट मार्शल १, २ व ३ वरील अंमलदार, क्यूआरटी पथकाचे २९ अंमलदार, एटीसीचे २ अंमलदार, सुरक्षा शाखेचा १ अधिकारी, झोन ३ स्ट्राइकिंग पथकासह १ अधिकारी व ८ अंमलदार, विशेष शाखेचे २ अंमलदार तसेच एटीएसचा १ अंमलदार यांचा सहभाग होता. याशिवाय अग्निशमन दलाचे पथक, ओरियन मॉलचे सुरक्षा अधिकारी, सुरक्षा रक्षक आणि रुग्णवाहिकेची टीमही उपस्थित होती. सर्व संबंधित यंत्रणांमध्ये प्रभावी समन्वय साधत बचावकार्य, नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा सराव करण्यात आला. या मॉकड्रील मुळे आपत्कालीन प्रसंगी यंत्रणांमधील समन्वय अधिक सक्षम होणार असून, नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
फोटो - ओरियन मॉल मध्ये पोलिसांचा मॉकड्रील
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image