उरणमध्ये सुपर-स्पेशालिटी डॉक्टरांची ओपीडी सुविधेचा शुभारंभ; मेडिकव्हर हॉस्पिटल्सचा अनोखा उपक्रम...
उरणमध्ये सुपर-स्पेशालिटी डॉक्टरांची ओपीडी सुविधेचा शुभारंभ; मेडिकव्हर हॉस्पिटल्सचा अनोखा उपक्रम...


पनवेल वैभव /  दि. २४ (वार्ताहर) : उरण तसेच असपासचा परिसरातील नागरिकांसाठी नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटल्सच्या वतीने आता सुपर-स्पेशालिटी डॉक्टरांची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे गंभीर आजारांवरील उपचारांसाठी नागरिकांना आता मुंबई किंवा इतर मोठ्या शहरांकडे धाव घेण्याची गरज भासणार नाही.
या उपक्रमाअंतर्गत मूत्रविकार तसेच मूत्रपिंडाशी संबंधित आजारांवरील तज्ज्ञ डॉक्टरांच्या ओपीडीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नेफ्रॉलॉजी उपचारांसाठी इंटरव्हेन्शनल नेफ्रोलॉजिस्ट डॉ. अमर कुलकर्णी हे दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी  दुपारी १२ ते २ या वेळेत उपलब्ध राहणार आहेत. ऑर्थोपेडिक्स व स्पाइन सर्जन डॉ. अरविंद जे. वाटकर हे महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी दुपारी २ ते ४ यावेळेत उपलब्ध असतील. तसेच ऑर्थोपेडिक्स विभागाचे संचालक, रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट, स्पोर्ट्स इंज्युरी आणि ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. श्रवण कुमार पवार हे देखील दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी २ ते ४ या वेळेत रुग्णसेवेसाठी उपलब्ध असतील. युरोलॉजिस्ट डॉ. विकास भिसे हे दर महिन्याच्या बुधवारी दुपारी १२ ते २ या वेळेत उपलब्ध राहणार आहेत. रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट आणि ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. प्रमोद भोर हे दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी दुपारी २ ते ४ या वेळेत  उपलब्ध राहणार आहेत. हृदयविकार तज्ज्ञ डॉ. तामरीउद्दीन धनावडे दर महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी दुपारी १२ ते २ या वेळेत उपलब्ध राहतील. दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी दुपारी १२ ते २ या वेळेत पोटविकार तज्ज्ञ डॉ. रावसाहेब राठोड यांच्या ओपीडीचा लाभ घेता येईल. ही वैद्यकीय सेवा पालवी हॉस्पिटलमध्ये दुपारी १२.०० ते २.०० व दुपारी २ ते ४ या वेळेत उपलब्ध होणार आहे. याकरिता पुर्व नोंदणी आवश्यक असून गरजूंनी ८६५५८४५८६६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे उरण व परिसरातील नागरिकांना वेळीच तज्ज्ञ डॉक्टरांकडून सल्ला आणि उपचार घेण्याची संधी उपलब्ध होणार असून, आरोग्यसेवेच्या दृष्टीने हा उपक्रम एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
फोटो : उरणमध्ये सुपर-स्पेशालिटी डॉक्टरांची ओपीडी सुविधेचा शुभारंभ
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image