गहाळ झालेले ८,९२,५७४/- किंमतीचे ५३ मोबाईल फोन मूळ मालकांना केले परत...
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखा, कक्ष २ यांनी गहाळ झालेले ८,९२,५७४/- किंमतीचे ५३ मोबाईल फोन मुळ मालकांना केले परत


पनवेल दि.०४(संजय कदम): नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखा, कक्ष २ यांनी गहाळ झालेले ८,९२,५७४/- किंमतीचे ५३ मोबाईल फोन मुळ मालकांना परत केले आहेत. 
         नवी मुंबई पोलीस आयुक्तालयांतर्गत असणाऱ्या पोलीस ठाणेकडे विविध इसमांकडून मोबाईल गहाळ झालेबाबतच्या तक्रारी नोंद करण्यात येतात. सदर तक्रारी नोंद करण्यात आल्यानंतर पोलीस ठाणेकडून गहाळ झालेल्या मोबाईलची माहिती "CEIR" या शासकीय पोर्टलवर भरण्यात येते. सदर पोर्टलवर गहाळ झालेल्या मोबाईल फोनची माहिती गुन्हेशाखा प्राप्त करते. गहाळ मोबाईल "CEIR" या शासकीय पोर्टलचे सहाय्याने व तांत्रिक तपास करुन गहाळ मोबाईलमध्ये नवीन मोबाईल नंबर निष्पन्न झाल्यानंतर महाराष्ट्र तसेच विविध राज्यातील इसमांना सदर मोबाईल नंबरवर संपर्क करुन मोबाईल धारकास मोबाईलचे वस्तुस्थितीबाबतची माहिती देवुन त्यांचेकडुन सदरचे मोबाईल फोन प्राप्त केले जातात. त्यानुसार सप्टेंबर २०२५ ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत गहाळ झालेले ८,९२,५७४/- किंमतीचे ५३ मोबाईल फोन कक्ष २, गुन्हे शाखेकडून प्राप्त केले. सदरचे ५३ मोबाईल फोन मुळ मालकांना परत देण्यात आले आहेत. गहाळ झालेले मोबाईल फोन परत मिळाल्याने मोबाईल मालकांनी त्याबाबत आनंद व्यक्त करुन नवी मुंबई पोलीसांचे कौतुक केले. तसेच भविष्यात ही पोलीसांनी अशीच चांगली कामगिरी करावी असे मत व्यक्त केले. सदरची उल्लेखनीय कामगिरी नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, दीपक साकोरे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, सचिन गुंजाळ, सहा. पोलीस आयुक्त, अजयकुमार लांडगे, गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली व वपोनि अनिल पाटील, कक्ष २, गुन्हे शाखा, नवी मुंबई यांचे देखरेखीखाली मपोहवा सुनिता चंदगीर, पोशि संतोष तांदळे, मपोशि स्नेहा गायकवाड यांनी केली आहे.
फोटो: गहाळ झालेले मोबाईल परत करताना पोलीस अधिकारी
Comments