वीर्यात एकही शुक्राणू नसलेल्या २६ वर्षीय तरुणावर मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार
शस्त्रक्रिया आणि हार्मोनल थेरपीनंतर अवघ्या सहा महिन्यातच गाठली २६ दशलक्ष शुक्राणूंची संख्या
नवी मुंबई / पनवेल वैभव : - नवी मुंबईत पहिल्यांदाच मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये युरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट डॉ. सनीश श्रृंगारपुरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने नॉन-ऑब्स्ट्रक्टिव्ह अॅझोस्पर्मियाने ग्रस्त असलेल्या २६ वर्षीय पुरूषावर यशस्वी शस्त्रक्रिया केली.नॉन-ऑब्स्ट्रक्टिव्ह अॅझोस्पर्मिया (NOA) हा पुरुष वंध्यत्वाच्या सर्वात गंभीर आणि आव्हानात्मक प्रकारांपैकी एक आहे, ज्यात पुरुषाच्या वीर्यात एकही शुक्राणू आढळत नाही. वृषणांना झालेली इजा, बालपणातील वृषणाचा संसर्ग, टॉर्शन टेस्टिस, रसायने आणि रेडिएशनच्या संपर्कात येणे, व्हॅरिकोसेल, हार्मोनल असंतुलन किंवा विकासात्मक समस्या यास कारणीभूत ठरु शकतात. यामध्ये नैसर्गिक शुक्राणू उत्पादन पुनर्प्राप्त करणे अत्यंत दुर्मिळ असून उपचारानंतरही केवळ ३० ते ४०% इतकी शक्यता असते.
या रुग्णामध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी खूप कमी झाली होती, टेस्टिक्युलर ऍट्रोफी (डाव्या अंडकोषाचा आकार कमी झाला) आणि वीर्यात एकही शुक्राणू नव्हता. शस्त्रक्रिया आणि हार्मोनल थेरपीनंतर सहा महिन्यांनी, त्याने एकूण शुक्राणूंची संख्या २६ दशलक्ष गाठली, त्याबरोबर शुक्राणुंची गतिशीलता आणि आकारही सुधारला
महाडचा रहिवासी राहुल राय (नाव बदलले आहे)*, जो व्यवसायाने आयटी अभियंता आहे, त्याच्या किशोरावस्थेतच शरीरात असे बदल दिसले जे सामान्य वाटत नव्हते, जसे की ऊर्जा कमी होणे, आत्मविश्वास खालावणे आणि समवयस्कांसारखे लैंगिक परिपक्वतेची लक्षणं दिसत नव्हती. त्यानंतर प्रत्येक वैद्यकीय अहवालाने त्याची भीती अधिकच वाढवली. जेव्हा त्याला शेवटी त्याच्या वीर्य विश्लेषण अहवालात शुक्राणू दिसले नाहीत तेव्हा त्याच्या पायाखाली जमीनच सरकली.
तो लग्नाबद्दलच्या चर्चा टाळत असे कारण त्याला नाकारले जाण्याची भीती होती.राहुल नातेसंबंध टाळत असे, मित्रांपासून दूर जात असे आणि तो कधी वडील होऊ शकेल की नाही या चिंतेने सतत. तो त्याचे दुःख शांतपणे सहन करत असे, अगदी जवळच्या मित्रांसोबतही ते शेअर करत नव्हता. भावनिक दबाव असह्य झाला जोपर्यंत त्याने वैद्यकीय मदत घेण्याचे धाडस केले नाही.
डॉ. सनीश श्रृंगपुरे(युरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट) म्हणाले,हा तरुण जानेवारी २०२५ मध्ये ओपीडीमध्ये आला होता. उजव्या अंडकोषात सतत सौम्य वेदना होत असल्याची तक्रार करत होता. वैद्यकिय मूल्यांकनात डाव्या अंडकोषात ग्रेड-३ व्हेरिकोसेलचे( वृषणांच्या शिरांमध्ये सूज येते आणि रक्त प्रवाहात अडथळा येतो) निदान झाले. रुग्णाची टेस्टोस्टेरॉन पातळी ३०० एनजी/डीएल इतकी कमी होती आणि त्याच्या वीर्य विश्लेषणात शुक्राणूच
नव्हते. रुग्णाला डाव्या ऑर्किडेक्टॉमीसह उजव्या सूक्ष्म व्हेरिकोसेलेक्टॉमी करण्याचा सल्ला देण्यात आला आणि त्यानंतर हार्मोनल थेरपी घेण्यात आली.
*डॉ. सनिश श्रृंगारपुरे सांगतात की,* नॉन-ऑब्स्ट्रक्टिव्ह अझोस्पर्मिया ही उपचार करण्यासाठी सर्वात आव्हानात्मक परिस्थितींपैकी एक आहे. यापैकी बरेच रुग्ण डॉक्टरांना भेटण्यापूर्वीच निराश आणि
मानसिकदृष्ट्या खचतात. त्यांना कधीच पालकत्वाचा आनंद घेता येणार नाही याची भीती त्यांच्या आत्मविश्वासावर आणि नातेसंबंधांवर परिणाम करते. आम्ही रुग्णाला स्पष्ट सांगितले की नैसर्गिकरित्या शुक्राणू पुनर्प्राप्तीची शक्यता फक्त 30%-40% होती आणि अपयशाचा अर्थ असा की त्याला मायक्रो-TESE सारख्या प्रगत पुनर्प्राप्ती प्रक्रियेची आवश्यकता असू शकते. फेब्रुवारी २०२५ मध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया होणार होती.
*डॉ. सनिष श्रृंगारपुरे म्हणाले,* संप्रेरक संतुलन स्थिर करण्यासाठी आणि त्याची शक्यता सुधारण्यासाठी टीमने उजव्या बाजूला सूक्ष्म व्हेरिकोसेलेक्टॉमी केली आणि काम न करणारा डाव्या वृषणाचा भाग काढून टाकला. रुग्णाला एचसीजी थेरपी आणि अँटीऑक्सिडंट्स सुरू करण्यात आले.
सहा महिन्यांपूर्वी, रुग्णावर डाव्या वृषणाची ऑर्किडेक्टॉमी, उजव्या सूक्ष्म व्हेरिकोसेलेक्टॉमी आणि स्पाइनल ऍनेस्थेसिया अंतर्गत इंट्रा-ऑपरेटिव्ह टेस्टिक्युलर बायोप्सी केली. बायोप्सीमध्ये दुय्यम शुक्राणूंच्या टप्प्यावर परिपक्वता थांबल्याचे दिसून आले, जे शुक्राणूंच्या विकासात गंभीर तडजोड दर्शवते. शस्त्रक्रियेनंतर, त्याला अँटीऑक्सिडंट्ससह 6 आठवड्यांसाठी एचसीजी इंजेक्शन देण्यात आले. सहा महिन्यांनंतर, त्याच्या वीर्य विश्लेषणात उल्लेखनीय पुनर्प्राप्ती दिसून आली ज्यामुळे भविष्यात पालकत्वाचे स्वप्न पूर्ण करता येईल.
अॅझोस्पर्मिया किंवा व्हेरिकोसेल असलेले पुरुष अनेकदा भीती, लाजिरवाणेपणा किंवा जागरूकतेच्या अभावामुळे उपचारांना विलंब करतात. परंतु वेळीच उपचाराने एखाद्याचे संपूर्ण भविष्य बदलता येऊ शकतो. या प्रकरणात शस्त्रक्रिया आणि हार्मोनल थेरपीचे संयोजन नैसर्गिक शुक्राणूंचे उत्पादन पुनर्संचयित करते, जे दुर्मिळ आहे. बरेच रुग्ण लग्नाचे विचार सुरू करतात तेव्हाच आमच्याकडे येतात. तोपर्यंत, भावनिक ताण खूप जास्त असतो. योग्य मार्गदर्शन, उपचार आणि आधुनिक मायक्रोसर्जिकल पर्यायांसह, असे बरेच पुरुष निरोगी प्रजनन जीवन जगू शकतात.
मी कधील पालकत्वाचे स्वप्न पूर्ण करु शकणार नाही या भीतीने मी जगत होतो, मला जोडीदाराकडून कधीही स्वीकारले जाणार नाही आणि मी कधीही सामान्य कौटुंबिक जीवन जगू शकणार नाही. जेव्हा मी मेडिकव्हरमधील डॉक्टरांच्या यशस्वी प्रयत्नांमुळे आज माझी वैद्यकीय स्थितीच बदलली आणि मला माझा आत्मविश्वास परत मिळाल. माझी स्वप्ने आणि माझे भविष्याची चिंता दूर झाल्याची प्रतिक्रिया रुग्णाने व्यक्त केली.