उलवेतील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये ११ ते १५ नोव्हेंबरदरम्यान स्पर्धा
३०० खेळाडूंचा सहभाग...
पनवेल (प्रतिनिधी) बॅडमिंटन ऑर्गनायझेशन ऑफ रायगड यांच्या वतीने व रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स यांच्या सहकार्याने आणि महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित करण्यात आलेली योनिक्स–सनराईज द्वितीय महाराष्ट्र सीनियर स्टेट सिलेक्शन रामशेठ ठाकूर ट्रॉफी बॅडमिंटन स्पर्धा मंगळवार दिनांक ११ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत उलवे नोड मधील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे होणार आहे. या स्पर्धेचे भव्य उद्घाटन समारंभ ११ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे संस्थापक माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते तर स्पर्धेचा अंतिम सामना व समारोप समारंभ १५ नोव्हेंबर रोजी दुपारी ०१ वाजता आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
राज्यातील सुमारे ३०० खेळाडू खालील गटांमध्ये स्पर्धा करणार असून पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष दुहेरी, महिला दुहेरी, मिश्र दुहेरी या गटांमध्ये हि स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेतील विजेते, उपविजेते आणि उपांत्य फेरीतील खेळाडूंना एकूण ०४ लाखांचे रोख बक्षिस, चषक प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वतीने अंतिम फेरीतील खेळाडूंकरिता अतिरिक्त दिड लाखांचे रोख पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. तरी क्रीडाप्रेमी आणि बॅडमिंटनप्रेमी नागरिकांनी या स्पर्धेचा मनसोक्त आनं बॅडमिंटनच्या रोमांचक लढतींचा उत्सव रंगणार आहे. द घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.