लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य विज्ञान प्रयोग प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन...
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी  वाढदिवसानिमित्त भव्य विज्ञान प्रयोग प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन
 

पनवेल (प्रतिनिधी) थोर दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदर लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त वर्षभर विविध स्पर्धा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड मधील सौ.शकुंतला रामशेठ ठाकूर सिबिएसई स्कुल येथे भव्य विज्ञान प्रयोग प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ज्याचे नाव प्रग्या 1.0 द पावर ऑफ अससटेनेबल फ्युचर असे ठेवण्यात आले होते. ज्याचे उद्घाटन सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर व सौ अर्चना परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेमध्ये ग्रुप अ,ब, क यामध्ये पनवेल व उरण विभागातील सुमारे 13 शाळांनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून सौ.शकुंतला रामशेठ ठाकूर सिबिएसई स्कुलचे चेअरमन व माजी सभागृह नेते परेश ठाकूर, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य  वाय.टी. देशमुख, स्थानिक स्कूल कमिटी मेंबर कविता खारकर, निलेश खारकर, धीरज ओवळेकर, तसेच रयतचे रायगड विभागीय अधिकारी मोहन कोंगेरे, पिआरओ बाळासाहेब कारंडे, डी.सी पाटील, रयत रlलिपिक संतोष गुजर, परीक्षक अनिल कौशिक व  चेतन कौशिक आदी मान्यवर उपस्थित होते. 
या प्रदर्शनामध्ये भविष्यातील एआय आधुनिक तंत्रज्ञान व विविध विषयांवर वेगवेगळे प्रयोग प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले होते व पुरातन विषयांमध्ये रायगड किल्ला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील नाणी व तलवारी भाले मराठी भाषा विभाग हिंदी भाषा विभाग व इंग्रजी भाषा विभाग यांची सांगड घालत दर्जेदार प्रयोग ठेवण्यात आले होते याप्रसंगी परेश ठाकूर यांनी भविष्यामध्ये प्रग्या 1.0 या 2.0, 3.0 होत जाओ अशा शुभेच्छा दिल्या व लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या प्रयोगाचे कौतुक करत असताना छोट्या शास्त्रज्ञांसाठी प्रयोगशाळा बांधणार असल्याचे आश्वासित केले.
Comments