कळंबोली येथे साईबाबा उत्सव प्रित्यर्थ भव्य कीर्तन महोत्सव सोहळा ...
पनवेल वैभव / प्रतिनिधी : -
कळंबोली येथे साईबाबा उत्सव प्रित्यर्थ भव्य कीर्तन महोत्सव सोहळ्याचे सोमवार दि.१७ ते शुक्रवार २१ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. या कीर्तन महोत्सवाच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायण करण्यात येणार आहे.
कळंबोली कॉलनीच्या सेक्टर ५ किती होणाऱ्या सोमवार दिनांक १७ नोव्हेंबर रोजी ह.भ.प.शिवचरित्रकार गणेश महाराज डांगे,मंगळवार १८ नोव्हेंबर रोजी ह.भ.प.समाज प्रबोधनकार कविराज महाराज झावरे,बुधवार १९ नोव्हेंबर रोजी ह. भ.प.समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर,२० नोव्हेंबर रोजी ह.भ.प.समाजप्रबोधनकार शिवलीला पाटील,शुक्रवार २१ नोव्हेंबर रोजी ह.भ.प.कबीर महाराज अत्तार,शनिवार २२ नोव्हेंबर रोजी ह.भ.प.लक्ष्मीप्रसाद कुलकर्णी महाराज,रविवार २३ नोव्हेंबर रोजी ह.भ.प.प्रा.निलेश महाराज कोरडे,सोमवार २४ नोव्हेंबर रोजी ह.भ.प.अश्विनीताई म्हात्रे यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.२३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्ताने श्री गणेश सहकारी गृहनिर्माण सोसायटी यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या सोहळ्यासाठी पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष महादेव नामदेव पाटील हे प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत.या सोहळ्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष व समाजसेवक आत्माराम नामदेव पाटील यांनी केले आहे.