डिसेंबरपर्यंत निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा...
नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देईपर्यंत संघर्ष सुरूच राहणार ....
नवी मुंबई / (दि. १२ ऑक्टोबर) : -
नवी मुंबई विमानतळाला राष्ट्रीय लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी सागरी भूमिपुत्र संघटनांची विशेष बैठक रविवारी दिघा येथील मुंबई एक्सप्रेस बँक्वेट येथे पार पडली. ठाणे, मुंबई, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील आगरी-कोळी व सागरी भूमिपुत्र संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीत उपस्थित होते.
या बैठकीचे अध्यक्षस्थान खासदार सुरेश (बाळ्यामामा)म्हात्रे यांनी भूषविले.या बैठकीचा मुख्य उद्देश म्हणजे नवी मुंबई विमानतळ नामविस्तार आंदोलनाचा पुढील आराखडा ठरवणे हा होता. मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी ३ ऑक्टोबर रोजी दिलेल्या सकारात्मक आश्वासनानंतर ६ ऑक्टोबर रोजीचा धडक मोर्चा स्थगित करण्यात आला होता. त्यावेळी ८ ऑक्टोबर रोजी तोंडी घोषणा होईल, अशी अपेक्षा होती, परंतु ती पूर्ण न झाल्याने भूमिपुत्रांमध्ये असंतोष पसरला आहे. त्यामुळे आगामी काळात पुन्हा आंदोलन छेडण्याच्या मागण्या सर्व संघटनांकडून सुरू आहेत.
खासदार सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, मुख्यमंत्री यांनी दोन महिन्यांची मुदत मागितली होती, ती ३ डिसेंबरला संपत आहे. त्या आधी जर नामविस्तार जाहीर झाला नाही, तर ३ डिसेंबर रोजी मोठे आणि तीव्र आंदोलन उभारले जाईल. त्यासाठी आतापासूनच संघटनांनी तयारी सुरू करावी, असे आवाहन त्यांनी केले. तसेच “दिबा विमानतळ नामविस्तार” हा प्रमुख मुद्दा ठेवून पाचही जिल्ह्यांतील अन्य प्रलंबित प्रश्नांवरही लोकांपर्यंत पोहोचावे, अशा सूचना दिल्या.
बैठकीदरम्यान बेलापूर ब्रिजवरील नामफलक उतरवणाऱ्या तरुणांचा — सँडी पाटील, सूरज म्हात्रे, विजेंद्र म्हात्रे, हिमांशु पाटील, प्रेम भोईर, ऋषी घरत, मनोज मेहेर, मुकेश मढवी आणि मनोज डोंगरे — सन्मान करण्यात आला. तसेच भूमिपुत्र चळवळीत प्रभावी नेतृत्व केल्याबद्दल खासदार सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे यांचाही संघटनेतर्फे सन्मान करण्यात आला. पाचही जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांच्या प्रतिनिधींचा गौरवही खासदारांच्या हस्ते झाला.
सुमारे ३५ संघटना आणि दीडशेहून अधिक प्रतिनिधी बैठकीस उपस्थित होते. बैठक यशस्वी पार पडण्यासाठी अॅड. रेवेंद्र पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विनामूल्य सभागृह व भोजन व्यवस्था उपलब्ध करून दिली, त्याबद्दल सर्वांनी कृतज्ञता व्यक्त केली.
या बैठकीस श्री. निलेश पाटील, रवी मढवी, डॉ. तपन पाटील, सुधाकर पाटील, गिरीश साळगावकर, सागर पाटील, गणेश भोईर, सत्यवान म्हात्रे, मधुकर माळी, सौ. वंदना गौरी, गजानन पाटील, अरविंद म्हात्रे, सर्वेश तरे, सुशांत पाटील, राज पाटील, अॅड. रोशन पाटील, प्रो. राजेंद्र मढवी, संतोष पवार, प्रकाश पाटील, वैभव म्हात्रे, विशाल भोईर, संतोष घरत, धीरज कालेकर, वैभव पाटील यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते व जासई ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष घरत, सदस्य आदित्य घरत, विवेक म्हात्रे उपस्थित होते.
बैठकीच्या शेवटी सर्व उपस्थितांनी एकमताने ठरवले की, “नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देईपर्यंत संघर्ष सुरूच राहील