महाबोधी महाविहारासंबंधी आंदोलन चर्चा मुंबई येथे संपन्न...
१४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मोर्चास आझाद मैदान येथे आंबेडकरी कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने उपस्थित
राहण्याचे आवाहन...

पनवेल वैभव वृत्त : -
आंबेडकरी चळवळीतील सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांची  कलिना येथे महाबोधी महाविहारासंबंधी आंदोलनासाठी चर्चा संबंधीची बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत रिपब्लिकन पार्टी चे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले, आंबेडकरी चळवळीतील सर्व प्रमुख पक्षांचे नेते, तसेच या बैठकीला स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे पक्षप्रमुख सागर भाई संसारे व रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे उपस्थित होते.   

14 ऑक्टोबर 2025 रोजी सर्व आंबेडकरी कार्यकर्त्यांचा भव्य मोर्चा आझाद मैदान येथे महाबोधी महाविहार यांविषयी चर्चा करण्याकरता आयोजित केलेला आहे . रायगड जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात येत आहे की आपण जास्तीत जास्त संख्येने 14 ऑक्टोबर 2025 रोजी आझाद मैदान येथे उपस्थित रहावे असे आवाहन महेश साळुंखे यांनी केले आहे.
Comments