"कांडपिळे हाईट्स" ख-या अर्थाने मोठ्या उंचीवर असणार आहे - लोकनेते मा.खा.रामशेठ ठाकूर...
"कांडपिळे हाईट्स " ख-या अर्थाने मोठ्या उंचीवर असणार आहे - लोकनेते मा.खा.रामशेठ ठाकूर

वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कांडपीळे परिवाराने अत्युच्य दर्जा गाठला आहे - आमदार प्रशांत ठाकूर....

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही वाटचाल करत आहोत - अजय कांडपीळे



पनवेल/प्रतिनिधी: 
''कांडपिळे हाईट्स '' ख-या अर्थाने मोठ्या उंचीवर असणार असल्याचे प्रतिपादन लोकनेते मा.खा.रामशेठ ठाकूर यांनी नेरे येथे केले. ते कांडपिळे  हाईट्स या इमारतीच्या भूमीपूजन प्रसंगी बोलत होते. यावेळी आ.प्रशांत ठाकूर, माजी नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे, भाजप नेते वाय.टी.देशमुख, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, जयवंत देशमुख, नेरे माजी सरपंच उदय ठाकूर यांच्यासह उद्योजक अजय कांडपिळे,संजय कांडपिळे ,गौरव कांडपिळे आदी उपस्थित होते.
यापुढे बोलताना ठाकूर म्हणाले की, कांडपिळे कुटुंब हे मला गुरू मानून बांधकाम क्षेत्रात उतरले असले तरी माझे क्षेत्र वेगळे आहे. जे नावाला जपतात, शिस्तबद्ध राहतात ते प्रतिष्ठित असतात.त्यामुळे कांडपिळे यांनी आपली प्रतिष्ठा जपली आहे.सुरूवात चांगली तर सर्व चांगले होते.कांडपिळे यांनी उद्योग क्षेत्रात आपली प्रगती केली आहे.ही इमारत आकर्षित दिसते तशी ती दर्जाने देखील चांगलीच होईल असे रामशेठ ठाकूर हे म्हणाले.
तसेच आ.प्रशांत ठाकूर यांनी, विमानतळ परिक्षेत्रात विकासाच्या दृष्टीने लोकसंख्या वाढू लागली आहे.त्या नागरिकांना उच्च दर्जाची घरे हवी आहेत. चांगली रहिवासी जागा हवी आहे.या बाबी कांडपिळे हाईटस च्या माध्यमातून पूर्ण होतील, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कांडपीळे परिवाराने अत्युच्य दर्जा गाठला आहे.असे सांगत कांडपिळे हाईटस हा प्रकल्प यशस्वी होईल आणि ग्राहकांची स्वप्ने पूर्ण होतील अशी अपेक्षा आ.ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केली. 
तर प्रकल्पाचे निर्माते अजय कांडपिळे यांनी आपल्या प्रास्ताविकात प्रकल्पाबाबत माहिती देत विरार - अलिबाग कॉरिडॉर च्या नैना प्राधिकरण च्या सर्व परवानगी घेवून लोकांना आवडेल अशा पद्धतीने व योग्य वेळेत हा प्रकल्प लवकरच पूर्ण करून लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा आदर्श आमच्या डोळ्यासमोर ठेवून आम्ही वाटचाल करत असल्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.
Comments
Popular posts
एकता मित्र मंडळ लाईन आळी तर्फे होलिकोत्सव व संत तुकाराम महाराज बीज निमित्त सत्यनारायण महापूजा आणि महाप्रसादाचे आयोजन...
Image
पनवेल महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या वतीने नितीन गावंड यांचा अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल...
Image
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नगरसेवक मनोज भुजबळ यांच्या निवासस्थानी दिली सदिच्छा भेट..
Image
पनवेल महानगरपालिकेत भाजप महायुतीचे पाच स्विकृत नगरसेवक ...
Image
गोदरेज प्रॉपर्टीजचा एक लाख घरांच्या विक्रीचा टप्पा पूर्ण ; कुटुंबाला मोफत घराची अनोखी भेट..
Image