करंजाडे भाजपच्यावतीने नवरात्रोत्सव, मोठ्या प्रमाणात नागरिकांचा सहभाग....
करंजाडे भाजपच्यावतीने नवरात्रोत्सव, मोठ्या प्रमाणात नागरिकांचा सहभाग....


पनवेल / प्रतिनिधी  - : श्री सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्था करंजाडे, भारतीय जनता पार्टी करंजाडे यांच्यावतीने सार्वजनिक नवरात्र उत्सवाचे आयोजन करंजाडे येथे करण्यात आले आहे. यंदाचे हे आठवे वर्ष असून या ठिकाणी महिला भगिनी, पुरुष, तरुण वर्गाची मोठ्या प्रमाणात गर्दी पहावयास मिळत आहे. 
          नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने दांडिया रास, पारितोषिक वितरण, विद्यार्थी गुणगौरव सोहळा, चित्रकला स्पर्धा, ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, वैद्यकीय तपासणी, खेळ पैठणीचा, महिला उद्योजकांचा सन्मान, महिला सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान, करंजाडे परिसरातील गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा गौरव, महिला शिक्षकांचा गौरव, शाळा सन्मान सोहळा यासारख्या कार्यक्रमांचे आयोजन या ठिकाणी दररोज करण्यात येत आहेत. दांडिया खेळण्यासाठी मोठ्या संख्येने महिला सहभागी होत आहेत. उत्कृष्ट परफॉर्मन्स करणाऱ्यांना बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येते. 
या नवरात्र उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन करंजाडेचे सरपंच मंगेश शेलार यांनी केले आहे
Comments
Popular posts
कु.सायली शिर्केने ॲडव्होकेट पदवी प्राप्त केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आला विशेष सत्कार..
Image
साईनगर परिसरात उभारलेल्या पोलीस मदत केंद्राचा लाभ विभागातील नागरिकांना होणार - पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर
Image
शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणे गरजेचे - महापौर नितीन पाटील
Image
प्रभाग क्रं.१४ साईनगर प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधा उपलब्ध करून देण्याची नगरसेविका कु.आर्या जाधव यांची मागणी...
Image
पनवेलच्या गोल्डन ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी ; राजीप शाळा रिटघर येथे केले शैक्षणिक साहित्य आणि छत्रीचे वाटप ....
Image