कामोठे व कळंबोलीतील शेकडो युवकांचा शिवसेनेत प्रवेश – स्थानिक स्वराज्य निवडणुकांपूर्वी पक्षात नवचैतन्य
पनवेल दि. 26 ( प्रतिनिधी) महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या कार्यकुशलतेवर विश्वास ठेवून कामोठा शहर प्रमुख सुनील गोवारी आणि कळंबोली शहर प्रमुख तुकाराम सरक यांच्या पुढाकाराने कळंबोली व कामोठा परिसरातील शेकडो युवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. गुरुवार, दिनांक २५ रोजी झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्याला खासदार श्रीरंग आप्पा बारणे व जिल्हाप्रमुख रामदासजी शेवाळे प्रमुख उपस्थित होते.
या युवकांच्या प्रवेशामुळे शिवसेनेत नवचैतन्य निर्माण झाल्याचे प्रतिपादन करताना जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे म्हणाले की, "युवा कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठा फायदा होणार आहे. हा पक्षप्रवेश ही निवडणुकांपूर्वी पक्षासाठी बळकटी ठरेल." या सोहळ्यात स्वप्निल हजारे, सिद्धू पाटील, वैभव नवले, विठ्ठल गाडेकर, संकेत कांबळे, स्वप्नील शिंदे, सुरज करणे, अजिंक्य गायकवाड, रोहन धाईगुडे, नवनाथ जगदाळे, राजदीप कापसे, सतपाल सिंग, बबलू केवट, रवी फाटे आदी युवकांनी औपचारिकरित्या शिवसेनेत प्रवेश केला. या कार्यक्रमाला तालुका प्रमुख रुपेश ठोंबरे, शहर संघटक श्रीकांत फाळके, उपशहर प्रमुख आनंदा माने, युवा नेते तुषार जाधव, माधव एरोळे, सुकुमार नलावडे, रणजित फडतरे, संतोष जाधव यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिक्रिया
कामोठा व कळंबोली परिसरातील तरुणाईचा पक्षप्रवेश हा केवळ राजकीय निर्णय नसून स्थानिक प्रश्न सोडविण्यासाठी युवावर्गाचा सहभाग वाढल्याचे चित्र या कार्यक्रमातून दिसून आले. आगामी निवडणुकांमध्ये या नव्या कार्यकर्त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
तुकाराम सरक
शहर प्रमुख कळंबोली