पनवेलमध्ये पैठणी महोत्सव ; आ.प्रशांत ठाकूर आणि आ.विक्रांत पाटील यांच्यासह हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन..
पनवेलमध्ये पैठणी महोत्सव ; आ.प्रशांत ठाकूर आणि आ.विक्रांत पाटील यांच्यासह हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन
पनवेल वैभव / दि.१३ (वार्ताहर): रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलतर्फे सोनी पैठणी महोत्सव आणि भव्य प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन पनवेल मतदार संघाचे आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार विक्रांत पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.१२) झाले. 
या महोत्सवात पनवेलमध्ये प्रथमच खास येवला येथील सोनी पैठणी साड्या थेट ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. हे प्रदर्शन आणि विक्री १२ ते १४ सप्टेंबर २०२५ दरम्यान पनवेल शहरातील विरुपाक्ष मंगल कार्यालयात सुरू राहणार आहे.
           रोटरी क्लबच्या वतीने नेहमीच समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात येत असतात. दरम्यान, या उपक्रमांसाठी निधीची गरज असते. हे लक्षात घेता रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल ने निधीचे संकलन करण्यासाठी पनवेल मधील विरुपाक्ष मंगल कार्यालयात सोनी पैठणी महोत्सव प्रदर्शन आणि विक्री आयोजित केले आहे. या महोत्सवाच्या उद्घानावेळी रोटरी क्लब पनवेल सेंट्रलचे मार्गदर्शक डॉ. गिरीश गुणे, माजी नगरसेवक प्रथमेश सोमण,
मोहिनी पाटील, प्रेसिडेंट अनिल ठकेकर सेक्रेटरी अतिष थोरात, डॉ. आमोद दिवेकर, डॉ. रमेश पटेल, लक्ष्मण पाटील, डॉ. संजीवनी गुणे, डॉ. कांचन दिवेकर, भागवान पाटील, शैलेश पोटे, फर्स्ट लेडी सारिका ठकेकर, योगेश महाजन, योगेंद्र कुरघोडे, सुदीप गायकवाड, ऋषिकेश बुवा रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलचे मार्गदर्शक डॉ. गिरीश गुणे, प्रेसिडेंट अनिल ठकेकर, सेक्रेटरी अतिष थोरात, असिस्टंट गव्हर्नर डॉ. स्वाती लिखिते यांच्यासह रोटरीचे सदस्य आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. दरम्यान, या महोत्सवाला पनवेल महापालिकेच्या माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, ममता म्हात्रे यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.



फोटो: प्रदर्शन उदघाटन
Comments
Popular posts
एकता मित्र मंडळ लाईन आळी तर्फे होलिकोत्सव व संत तुकाराम महाराज बीज निमित्त सत्यनारायण महापूजा आणि महाप्रसादाचे आयोजन...
Image
पनवेल महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या वतीने नितीन गावंड यांचा अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल...
Image
पनवेल महानगरपालिकेत भाजप महायुतीचे पाच स्विकृत नगरसेवक ...
Image
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नगरसेवक मनोज भुजबळ यांच्या निवासस्थानी दिली सदिच्छा भेट..
Image
गोदरेज प्रॉपर्टीजचा एक लाख घरांच्या विक्रीचा टप्पा पूर्ण ; कुटुंबाला मोफत घराची अनोखी भेट..
Image