'व्हॉइस ऑफ रिकव्हरी'द्वारे रुग्णांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी अनोखा प्रयोग....
मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये विशेष संवादात्मक सत्राचे आयोजन..
नवी मुंबई: नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटल्सने 'द व्हॉइस ऑफ रिकव्हरी' नावाचा एक रुग्ण सक्षमीकरण कार्यक्रम आयोजित केला होता, जो भूतकाळात शस्त्रक्रिया केलेल्या रुग्णांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करुन देतो जेणेकरुन भविष्यात शस्त्रक्रिया करु इच्छिणाऱ्या रुग्णांना प्रोत्साहन मिळेल. या कार्यक्रमामुळे रुग्णांना वास्तविक अनुभवांशी जोडता येते तसेच शस्त्रक्रियेपूर्वी त्याबाबत असलेल्या शंका दूर करता येतात. या अनोख्या सत्रात सुमारे ५० हून अधिक रुग्ण सहभागी झाले होते.
इतर रुग्णांचे अनुभव ऐकून मला दिलासा मिळाला तसेच शस्त्रक्रियेबाबत असलेल्या शंका दूर झाल्या. या अशा अनोख्या सत्राचे आयोजन केल्याबद्दल मी मेडिकव्हर हॉस्पिटलचा खरोखर आभारी आहे. या उपक्रमामुळे शस्त्रक्रियेबाबत असलेले गैरसमज दूर झाले. रुग्णालयाने असे आणखी उपक्रम राबविले पाहिजे अशी प्रतिक्रिया एका रुग्णाने व्यक्त केली.
आपण अनेकदा पाहतो की रुग्णांना शस्त्रक्रियेपुर्वीच प्रक्रियेविषयीची भीती सतावू लागते. हिच भिती घालवण्यासाठी शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना आणि शस्त्रक्रिया करु इच्छिणाऱ्या रुग्णांना एकत्र आणले गेले होते. वास्तविक अनुभव ऐकल्याने नवीन रुग्णांच्या मनातली शस्त्रक्रियेची भीती दूर होऊन, हे रुग्ण मोठ्या आत्मविश्वासाने ओटीमध्ये प्रवेश करत असल्याची प्रतिक्रिया मेडिकव्हर हॉस्पिटल्सचे केंद्र प्रमुख डॉ. माताप्रसाद गुप्ता यांनी व्यक्त केली.
'द व्हॉइस ऑफ रिकव्हरी' उपक्रमाद्वारे आम्ही रुग्णांमध्ये असलेली शस्त्रक्रियेची भिती दूर करण्याचा प्रयत्न करतो. हा कार्यक्रम उत्तमोत्तम रुग्णसेवा पुरविण्यासाठी नक्कीच फायदेशीर माहिती अशी प्रतिक्रिया मेडिकव्हर हॉस्पिटल्समधील महाराष्ट्र आणि कर्नाटक प्रदेशाचे प्रादेशिक संचालक नीरज लाल यांनी दिली.