आ.प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त युवा नेता प्रतिक बहिरा यांंच्यातर्फे जनहित उपक्रम...
आ.प्र्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त युवा नेता प्रतिक बहिरा यांंच्यातर्फे जनहिताचा उपक्रम..


पनवेल, दि.4 (वार्ताहर) ः आ.प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून युवा नेते प्रतिक बहिरा यांनी जनहिताचा उपक्रम राबवत तहसील कार्यालय पनवेल यांच्या सहकार्याने आधार कार्ड रेशनकार्ड सोबत लिंक करण्यासाठी विशेष शिबीर राबविले होते.
भाजप युवा नेते प्रतिक देवचंद बहिरा जनसंपर्क कार्यालय येथे सर्वसामान्य नागरिकांसाठी तहसील कार्यालय पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने जनहिताचा उपक्रम म्हणून आधार कार्ड व रेशन कार्ड एकत्रित लिंक करून सरकारी योजनेचा लाभ अचूकपणे मिळावा या अंतर्गत त्यांनी हा उपक्रम राबविला. या उपक्रमाला पनवेल परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
फोटो ः जनहिताचा उपक्रम
Comments