घरकाम करणाऱ्या नोकराने ४२ लाख ६० हजार किमतीचे दागिने पळविले ; खारघर पोलिसांनी केली मुद्देमालासह अटक
पनवेल वैभव / दि.१७(संजय कदम): खारघर येथील घरकाम करणाऱ्या नोकराने घरातुन रू. ४२,६०,०००/- किमंतीचे सोन्यावे व चांदीचे व डायंमडचे दागिने, रोख रक्कमेसह पळुन गेलेल्या नोकरास खारघर पोलीस ठाण्याचे पथकाने शिताफिने जालौर, राजस्थान येथुन ताब्यात घेवुन त्याचेकडुन गुन्हयातील १००% मालमत्ता हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणला आहे.
खारघर पोलीस ठाण्यात फिर्यादी यांनी त्यांचे घरात काम करणारा दौलत शैतान सिंग (वय २५) याने त्यांचे घरातील ४२,६०,०००/- रूपये रकमेचे सोन्याचे, चांदीचे दागिने डायमंड व रोख रक्कम अशी चोरी करून पळुन गेल्याबाबत फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. नमुद दाखल गुन्हयाचे तपासकामी खारघर पोलीस ठाण्याचे वपोनि अजय कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरज पाटील, (गुन्हे), पोलीस उप निरीक्षक सुरज जाधव, पोहवा सुरेश कासार, पोना मच्छिद्र खेडकर, पोशि अविनाश मोरे, सीडीआर एसडीआर विश्लेषक पोहवा वैभव शिंदे यांचे पथक तयार करून आरोपीचे राहत्या पत्तावर पाठविण्यात आले होते. नमुद पथकाने आरोपीच्या राहत्या पत्तावर सिरोही राजस्थान येथे पाळत ठेवली होती. पंरतु आरोपी हा त्याचे लोकेशन बदलुन वावरत होता. आरोपीचे लोकेशन हे हिमाचल येथे आल्याने त्यास पकडण्याकामी दुसरे पथक रवाना करण्यात आले होते. आरोपीचे लोकेशन जालौर, राजस्थान येथे आल्याने नमुद पथकाने त्यास शिताफिने ताब्यात घेवुन त्याचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबुली दिली असुन गुन्हयातील चोरी केलेला रूपये ४२,६०,०००/- रूपये रकमेचे सोन्याचे, चांदीचे दागिने डायमंड व रोख रक्कम असा मुद्देमालासह त्यास पुढील कारवाईकामी ताब्यात घेण्यात आले आहे.
फोटो: खारघर पोलिस मुद्देमालासह