लायन्स क्लब पनवेल, लिओ क्लब पनवेल आणि लिओ क्लब पनवेल ल्यूमिना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक लोकसंख्या दिनाचा उपक्रम संपन्न...
पनवेल वैभव / दि. 13 (वार्ताहर) : लायन्स क्लब पनवेल, लिओ क्लब पनवेल आणि लिओ क्लब पनवेल ल्यूमिना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक लोकसंख्या दिनाचे अनोख्या पद्धतीने आयोजन करण्यात आले.
समाजहिताच्या कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या लायन्स क्लब पनवेलने या वेळी धरती माँ वर्सेस मानव या जनजागृती पथनाट्याच्या माध्यमातून पनवेल शहरातील पाच प्रमुख ठिकाणी जनतेमध्ये लोकसंख्या वाढीबाबत जागरूकता निर्माण केली. भारतातील वाढती लोकसंख्या आणि तिचा विकासावर होणारा परिणाम या विषयावर प्रभावी संदेश देणारे हे पथनाट्य जनमानसाच्या मनाला भिडले.
या उपक्रमाचे रेल्वे स्टेशन अधिकारी सत्येंद्र सिंह व सहाय्यक पोलीस आयुक्त विकास पवार यांनी विशेष कौतुक केले व आयोजकांचे अभिनंदन केले.
या उपक्रमाचे आयोजन लायन सुरभी पेंडसे, अध्यक्ष, लायन्स क्लब पनवेल, लिओ आरुषी गोडबोले, अध्यक्ष, लिओ क्लब पनवेल, लिओ अनिका पोतदार, अध्यक्ष, लिओ क्लब पनवेल ल्यूमिना तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लायन अशोक गिल्डा, लायन ज्योती देशमाने, लायन नागेश देशमाने, लायन मंगला ठाकूर, लायन प्रतिमा चौहान, लायन मोतीलाल जैन, लायन गौतम म्हात्रे, लायन के. एस. पाटील, लायन सुयोग पेंडसे, तसेच सर्व लिओ सदस्य त्यामध्ये लिओ आरुशी गोडबोले, लिओ अदिश्री पाटील, लिओ एलएन कशिश गनजावे, लिओ श्रेया तावरे, लिओ एलएन आदित्य पुंडे, लिओ अनिका पोतदार, लिओ क्रिष्णा कडिअन, लिओ रिषा फर्नांडीस, लिओ स्वरा पेंडसे या सर्वांच्या संयुक्त प्रयत्नातून जनजागृती उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि तो यशस्वीरीत्या पार पडला.
फोटो ः लायन्स क्लबतर्फे जनजागृती