सकल मराठा समाज मंडळ खांदाकॉलनी आयोजित विद्यार्थी - पालक गुणगौरव सोहळा २०२५ संपन्न ..
सकल मराठा समाज मंडळ खांदाकॉलनी आयोजित विद्यार्थी - पालक गुणगौरव सोहळा २०२५ संपन्न ..
पनवेल वैभव / दि. १४ ( वार्ताहर )  :   सकल मराठा समाज मंडळ, खांदा कॉलनी यांच्या वतीने आयोजित विद्यार्थी-पालक गुणगौरव सोहळा २०२५ मोठ्या उत्साहात मराठा भवन, सेक्टर ९ खांदा कॉलनी येथे संपन्न झाला. या कार्यक्रमात इयत्ता दहावी व बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सन्मान करण्यात आला.
                     कार्यक्रमाची सुरुवात "गुरुमंत्र यशाचा" या विशेष शैक्षणिक मार्गदर्शन सत्राने झाली, ज्याचे मार्गदर्शन प्रा. गिरीश चव्हाण सर (वर्धिष्ण फाउंडेशन, खांदा कॉलनी) यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांना यशाकडे नेणाऱ्या मार्गावर प्रेरणादायी विचार दिले.कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून विधान परिषदेचे दमदार आमदार विक्रांत बाळासाहेब पाटील यांची उपस्थिती लाभली. त्यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली आणि सकल मराठा समाज मंडळ खांदाकॉलनी च्या  उपक्रमाचे कौतुक केले.

मराठा समाजाचे नेते रामदास शेवाळे, सामाजिक कार्यकर्ते रुपेश ठोंबरे यांनी देखील मराठा भवन कार्यालयात उपस्थित राहून गुणगौरव कार्यक्रमाचे कौतुक केले.सकल मराठा समाज मंडळ खांदा कॉलनी चे सल्लागार रामचंद्र ढोबळे,  शिवाजी दांगट, अध्यक्ष संतोष जाधव, सचिव सदानंद शिर्के यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले. विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा देखील विशेष सन्मान झाला. या उत्साही सोहळ्यास सकल मराठा समाज मंडळाचे सर्व सदस्य, पदाधिकारी व समाजबांधव, विध्यार्थी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.


फोटो - सकल मराठा समाज मंडळातर्फे गुणगौरव सोहळा
Comments