पनवेल महानगरपालिकेने अभय योजना लागू केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे मानण्यात आले आयुक्त मंगेश चितळे यांचे आभार...
पनवेल दि.१८(वार्ताहर): पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या आदेशाने व त्यांच्या अधिकारांतर्गत मालमत्ता करावरील शास्तीमध्ये सवलत देण्याकरीता “ अभय योजना “ लागु करण्यात आली , यामधुन आता जरी पनवेल मधील नागरीकांकरीता शास्तीमधील दिलासा मिळाला असला तरी शिवसेना पक्षाच्या वतीने संपुर्ण करमाफी करीता पुढील काळात हा लढा चालुच राहील, असे असले तरी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे मानण्यात आले आयुक्त मंगेश चितळे यांचे आभार मानण्यात आले.
यावेळी जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या सुचनेनुसार आयुक्त मंगेश चितळे यांचे शिवसेना पनवेल महानगरप्रमुख अवचित राऊत , पनवेल शहर प्रमुख प्रवीण पोपटराव जाधव , खांदा कॅालनी शहरप्रमुख सदानंद शिर्के , कामोठे शहरप्रमुख रामदास गोवारी, कळंबोली शहरप्रमुख सूर्यकांत म्हसकर, तळोजा शहरप्रमुख प्रदीप केणी, पनवेल उपशहर सनी टेमघरे, प्रशांत नरसाळे , अमित माळी ,संतोष तळेकर , मयुरेश पाटील यांनी आभार मानले.
फोटो: आयुक्त मंगेश चितळे यांचे आभार