रोटरी कर्णबधिर मुलांच्या शाळेत पालक सभेचे यशस्वी आयोजन...
रोटरी कर्णबधिर मुलांच्या शाळेत पालक सभेचे यशस्वी आयोजन


पनवेल दि. ०१ ( वार्ताहर ) : रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊन चॅरिटेबल ट्रस्ट संचलित श्रीमती राधाबाई खेमचंद परमार रोटरी कर्णबधिर मुलांच्या विशेष निवासी शाळेत शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील प्रथम एकत्रित पालक सभेचे  यशस्वी आयोजन करण्यात आले.
                      सदर पालक सभेस ट्रस्ट चेअरमन अरविंद सावळेकर, ट्रस्ट सचिव प्रमोद  वालेकर, क्लब अध्यक्ष चारुदत्त भगत, ट्रस्ट माजी सचिव राजेंद्र ठाकरे आदि मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली. शाळेच्या प्र मुख्याध्यापिका शैला बंदसोडे यांनी सर्व पालकांना विद्यार्थ्यांसाठी आवश्यक त्या सूचना मांडल्या. ट्रस्ट चेअरमन सावळेकर यांनी उपस्थित पालकांशी सुसंवाद साधून मार्गदर्शन केले.निवास विभागात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन सर्व सोयी सुविधांचा लाभ घ्यावा असे पालकांना आवाहन केले.सदर पालक सभेचे निवेदन शाळेतील वि शिक्षिका रेश्मा घाग  यांनी केले. अशा प्रकारे 2025-26 या शैक्षणिक सत्रांतील पहिली पालकसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.




फोटो - रोटरी कर्णबधिर मुलांच्या शाळेत पालक सभा
Comments