स्व.सुमन साळुंखे यांच्या स्मृतिदिना निमित्त रायगड जिल्हापरिषद शाळा वडघर येथे खाऊ व वह्या वाटप कार्यक्रम संपन्न
पनवेल वैभव / प्रतिनिधी : स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांच्यावतीने मातोश्री स्व. सुमन साळुंखे यांच्या स्मृती दिनानिमित्त रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडघर येथे मोफत वह्या व खाऊ वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.
महेश साळुंखे हे दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्या वाटप ,खाऊचे वाटप तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व त्यांना सहकार्य करणे असे समाजोपयोगी कार्यक्रम करत सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम ते करत असतात.
सदर कार्यक्रमाकरिता प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार संजय कदम, पत्रकार अनिल कुरघोडे, सामाजिक कार्यकर्ते बाबा नाईक, जावेद मास्टर, निलेश कांबळे, समाधान कांबळे ,भारत दाताड, चंद्रकांत वेळासकर, मनोज कांबळे ,शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक जयदास घरत, पालक वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी मोठ्यासंख्येने उपस्थित असलेल्या मुला- मुलींना खाऊचे व वह्यांचे वाटप उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.