अर्धवट कामांबाबत युवासेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महापालिकेला निवेदन ...
अर्धवट कामांबाबत युवासेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महापालिकेला निवेदन ...
पनवेल वैभव / दि. २६ (संजय कदम) : कळंबोली शहरातील नवीन मात्र अर्धवट काम चालू असलेल्या रस्त्यांमुळे कळंबोलीतील नागरिकांना विशेषतः वयोवृद्ध तसेच शालेय विद्यार्थी यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सदर विषयाला अनुसरून आज युवासेना महानगर समन्वयक जय कुष्टे यांनी पनवेल महानगरपालिका उपायुक्त कैलास गावडे यांची भेट घेतली व सदर विषयाचे निवेदन सुपूर्द केले. 
कळंबोली शहरामध्ये तुकड्या तुकड्यांमध्ये केलेले काँक्रिटीकरण, खड्ड्यांनी भरलेले अर्धवट रस्ते, तसेच जागोजागी पडलेल्या लोखंडी शिगा आणि बांधकामाचे सामान यामुळे कळंबोलीतील रस्त्यांची अत्यंत वाईट दुरावस्था झाली आहे. तसेच याला जोडून असणारी ड्रेनेज व्यवस्था तसेच त्या ड्रेनेज व्यवस्थेवरील झाकणे यांचीही अवस्था अत्यंत दुर्लक्षित आहे. सदर विषयाला अनुसरून आज युवासेना महानगर समन्वयक जय कुष्टे यांनी पनवेल महानगरपालिका उपायुक्त कैलास गावडे यांची भेट घेतली व सदर विषयाचे निवेदन सुपूर्द केले. सदर रस्त्यांच्या कंत्राटदारांना तातडीने सूचना करून अर्धवट कामे तातडीने पूर्ण करावीत तसेच काम पूर्ण होईपर्यंत पर्यायी व्यवस्थेचे सूचना फलक जागोजागी लावावेत अशी मागणी केली. यावेळी युवासेना जिल्हाधिकारी पराग मोहिते, युवासेना महानगर चिटणीस जीवन पाटील, युवासेना उपशहर अधिकारी दुर्गेश शुक्ला आणि रवी शर्मा सोबत उपस्थित होते.
फोटो : निवेदन देताना युवासेना पदाधिकारी
Comments
Popular posts
महापालिकेच्यावतीने बावन बंगला परिसरातील अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई...
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेच्या २८ व्या वर्धापनदिन दिनानिमित्त बबनदादा पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे होणार थाटात उद्घाटन...
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल विधानसभा क्षेत्रात सामाजिक उपक्रमांची मालिका; 'बुके' नव्हे 'बुक' संकल्पनेतून सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा...
Image
आईशा मदरसा तर्फे रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न ...
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभुदास भोईर यांच्यावतीने रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रम ...
Image