पनवेल शहर पोलिसांच्या तत्परतेमुळे सोन्याच्या दागिन्यांची पिशवी मिळाली परत ...
पनवेल शहर पोलिसांच्या तत्परतेमुळे सोन्याच्या दागिन्यांची पिशवी मिळाली परत ..
पनवेल दि.२१(वार्ताहर): पनवेल शहर पोलिसांच्या तत्परतेमुळे एका महिलेकडील सोन्याच्या दागिन्यांची  पिशवी हरवली होती ती तांत्रिक तपास व गुप्त बातमीदाराच्या आधारे परत मिळून सदर महिलेला ती परत करण्यात आली आहे. 
          पनवेल शहर पोलीस ठाणे येथे मेघा नरेश पाटील, (राहणार भाताण) यांनी पोलीस ठाणे येथे येऊन सांगितले की त्यांचे सोन्याचे दागिने हे भाताण ते जवेरी बाजार अशा प्रवासादरम्यान कुठेतरी पडून गहाळ झाले आहेत. सदरचे सोन्याचे दागिने हे पनवेल येथे गहाण ठेवून त्या बदल्यात पैसे घेऊन मुलाच्या शाळेची फी भरायची होती परंतु त्यापूर्वीच दागिने हे कोठेतरी पडून गहाळ झाले आहेत. सदरचे दागिने  सापडले नाही तर मुलाची शाळेची फी भरता येणार नाही असे बोलून जोरजोराने रडू लागल्या. सदर महिलेच्या तक्रारीची त्वरित दखल घेत त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्यांची तक्रार नोंदवून पनवेल शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाने  वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला. 
सदर तपासा दरम्यान जवळपास 35 ते 40 सीसीटीव्ही कॅमेरे चेक करून त्यांचे गहाळ झालेले सोन्याचे दागिने हे एक अनोळखी व्यक्तीस सापडले आहे असे सीसीटीव्ही फुटेज तपासताना निदर्शनास आले. त्यानंतर सदर अनोळखी व्यक्तीचा शोध सुरू करून पुढील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर गुप्त बातमीदारांमार्फत देखील अनोळखी व्यक्तीचा शोध सुरू केला. त्यानुसार सदर अनोळखी व्यक्तीची ओळख पटवून त्यास ताब्यात घेतले व त्यानंतर त्याने महिलेचे हरवलेले सोन्याचे दागिने हे त्याला रस्त्यावर पडलेले सापडल्याचे कबूल केले. त्यानुसार त्या इसमाने ते दागिने पनवेल शहर पोलिसांना परत केले. त्यानंतर पनवेल शहर पोलिसांनी सदर महिलेस पोलीस ठाणे येथे बोलावून तिचे गहाळ झालेले सोन्याचे दागिने हे तिला परत केले. 
सदर चे दागिने महिलेस परत मिळाल्यानंतर तिने वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, सपोनी प्रकाश पवार, तुषार बोरसे, अमोल पाटील, संदेश म्हात्रे, महेश पाटील, माधव शेवाळे, परेश म्हात्रे, मिथुन भोसले, विशाल दुधे, किरण कराड तसेच पोलीस मित्र रमिज पटेल व पोलीस मित्र सद्दाम मुल्ला यांचे आभार मानले आहेत. पोलिसांनी तत्परतेने दागिन्यांची पिशवी परत मिळवून दिल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 


फोटो : सोन्याचे दागिने
Comments
Popular posts
महापालिकेच्यावतीने बावन बंगला परिसरातील अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई...
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेच्या २८ व्या वर्धापनदिन दिनानिमित्त बबनदादा पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे होणार थाटात उद्घाटन...
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल विधानसभा क्षेत्रात सामाजिक उपक्रमांची मालिका; 'बुके' नव्हे 'बुक' संकल्पनेतून सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा...
Image
आईशा मदरसा तर्फे रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न ...
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभुदास भोईर यांच्यावतीने रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रम ...
Image