शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पनवेल विभागप्रमुखपदी अमोल गोवारी तर शाखा प्रमुखपदी मयुरेश पाटील यांची नियुक्ती...
पनवेल वैभव / दि. ११ ( वार्ताहर ) : शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे )पक्षाच्या पनवेल प्रभाग क्रमांक २० च्या विभागप्रमुखपदी अमोल गोवारी तर प्रभाग १९ च्या शाखा प्रमुखपदी मयुरेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आल्याने शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे .
पनवेल शहर शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात शिवसेना उपनेते सुरेंद्रनाथ माने,शिवसेना उपनेते बबनदादा पाटील, संपर्क प्रमुख प्रसाद भोईर ,जिल्हाप्रमुख शिरीष घरत ,उप जिल्हाप्रमुख रामदास पाटील ,युवासेना रायगड जिल्हा प्रमुख पराग मोहिते, युवासेना महानगर प्रमुख अवचित राऊत, शहर प्रमुख प्रवीण जाधव, शिवसेना शहर संघटिका अर्चना कुळकर्णी, उपशहर संघटक नंदकुमार घरत, मा. नगरसेवक अच्युत मनोरे, जेष्ठ शिवसैनिक जयवंत परदेशी,रणजित परदेशीं , प्रविण डावलेकर, वैभव मढवी ,जिवन मढवी,शाखा प्रमुख अलकेश जाधव, उपशाखा प्रमुख सुधीर मिसाळ, सर्वेश पवार, सनी मिसाळ आणि शिवसैनिक उपस्थित होते.
फोटो - शिवसेना नियुक्ती कार्यक्रम