खारघर शहरात होणार्‍या अनियमित पाणीपुरवठा संदर्भात शिवसेना पदाधिकाऱ्यांचे सिडको व पनवेल महानगरपालिकेला निवेदन..
खारघर शहरात होणार्‍या अनियमित पाणीपुरवठा संदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकार्‍यांचे सिडको व पनवेल महानगरपालिकेला निवेदन
पनवेल, दि.1 (वार्ताहर) ः गेल्या महिनाभराहून अधिक काळ खारघर शहरात सिडकोच्या माध्यमातून अपुरा व अनियमित पाणीपुरवठा होत आहे. व त्याकडे सतत दुरुस्तीचे कारण देत सिडको टाळाटाळ करत आहे. पाणी टंचाई मुळे अनेक सोसायट्या टैंकर द्वारे पाणी विकत घेत असून, त्यांना आर्थिक बोजाही सहन करावा लागत आहे व त्यामुळे खारघरमधील सिडकोने बांधलेल्या सोसायटीतील सर्व नागरिक त्रस्त आहेत. अनेक गृहनिर्माण संस्थानी पाणी सुरळीतपणे मिळावे याकरिता निवेदन दिली आहेत. परंतु सिडको केवळ आश्‍वासन देत दुर्लक्ष करत असल्याने शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या सूचनेनुसार खारघर शहर समन्वयक रामचंद्र देवरे, उपशहर प्रमुख नंदु वारुंगसे, प्रशांत जांभुळकर, विभागप्रमुख उत्तम मोर्वेकर, शिव आरोग्य सेनेचे खारघर शहर समन्वयक सचिन सावंत, शाखाप्रमुख आप्पा वारंग यांनी सिडको पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता गायकवाड सर व सहाय्यक कार्यकारी अभियंता देवरे यांना निवेदन देऊन अपुर्‍या व अनियमित बिलात पाणी लाभकर आकारत असल्याने पनवेल नगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदन देण्यात आले.
पनवेल महानगरपालिका खारघर शहराला पाणीपुरवठा करत नसताना ही पाणी लाभकर आकारत असल्याने खारघरकरांना नियमित व सुरळीत पाणीपुरवठा मिळवून देण्याची नैतिक जबाबदारी महानगरपालिकेने स्वीकारण्याची गरज असल्याची बाब निवेदनाद्वारे मांडण्यात आली. तसेच खारघर शहराला पुरेसा व नियमित पाणी पुरवठा व्हावा, यासाठी सिडको अधिकार्‍यार्‍यांशी चर्चा करून आवश्यक ती उपाययोजना होत असलेल्या पाणीपुरवठ्या बाबत्तीत चर्चा करण्यात आली. दुरुस्तीची कामे बर्‍यापैकी झाली असून काही अशी कामे बाकी असल्याने तसेच कधी एम. आय. डी. सी. तर कधी नवी मुंबई महानगरपालिका शटडाऊन घेत असल्याने पाणी वितरणावर परिणाम होत असून अपुरा व अनियमित पाणीपुरवठा होत असल्याची बाब मान्य करण्यात आली. पाणी वितरणात नियमितता यावी व पूर्वीप्रमाणे पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून, पुढील दोन दिवसात पूर्वीप्रमाणे पाणीपुरवठा सुरु करण्याचे प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच, पनवेल महानगरपालिका मालमत्ता कराच्या करण्याची मागणी करण्यात आली. या बाबतीत पनवेल महानगरपालिका करून पाणी पुरवठा मुबलक व करून देण्यास कार्यक्षम नसेल हस्तक्षेप सुरळीत तर, खारघरकरांनी पाणी लाभकर पनवेल महानगरपालिकेला का द्यावा असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खारघर शहर समन्वयक रामचंद्र देवरे व उपशहर प्रमुख नंदु वारुगसे यांनी केला. तसेच महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या चव्हाण यांनी संबंधित विषयावर सिडको अधिकार्‍यांशी चर्चा करून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्‍वासनही दिले.
फोटो ः शिवसेना निवेदन
Comments