पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील रखडलेल्या नागरी कामांविरोधात शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उठविला आवाज...
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील रखडलेल्या नागरी कामांविरोधात शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उठविला आवाज...

पनवेल, दि.30 (वार्ताहर) ः पनवेल महानगरपालिका अंतर्गत क्षेत्रातील पनवेल शहर, नवीन पनवेल, खांदा कॅालनी, कामोठे, कळंबोली, तळोजा व खारघर नागरी वसाहती मधील पावसाळा पूर्वीची कामे आजपर्यंत पूर्ण झालेली नाहीत, त्यामुळे अवकाळी झालेल्या पावसाने पूर्ण पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील अनेक नागरी भागात पाणी साचल्याने व घरात पाणी शिरल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे तसेच छोट्या व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान झाले. सदराची बाब लक्षात घेता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत यांच्या वतीने आज पनवेल महापालिका अतिरिक्त आयुक्त गणेश शेट्टे यांच्या दालनात बैठक घेऊन सदारचा प्रश्‍न मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी पनवेल महापालिका तळोजा अंतर्गत येणार्‍या सर्व शहरातील प्रश्‍न अतिरिक्त आयुक्त यांच्या कडे मांडण्यात आले. त्यामध्ये तळोजा येथे जाण्याकरिता एकच मार्ग आहे तो म्हणजे तळोजा अंडरपास. सदरचा रस्ता हा पावसाळ्यात पाणी साचून भरला जातो त्यामुळे ये-जा करणा-या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो याचा पर्यायी मार्ग म्हणून रेल्वेच्या जवळचा ब्रिड्ज (पूल) येथून मार्ग काढावा अशी मागणी करण्यात आली. तसेच तक्का पनवेल गाढीनदीच्या पात्रात के.टी. अँड एल.के. स्वीट होमर्स बिल्डर्स यांनी पन्नास ते साठ फुट उंचीचा मातीचा भराव नदीपात्रात केलेला आहे. त्यामुळे काळुंद्रे गावाला पावसाळ्यात पुराचा धोका निर्माण होऊ शकतो. संबंधित बिल्डरवर योग्य ती कारवाई करून काम तत्काल थांबविण्यात यावे व बिल्डर ला नदीच्या पात्रातून केलेला भराव त्वरित काढवयास सांगावे अशी विनंती अर्ज केला. कामोठे येथील रस्त्यालगतची तसेच गार्डन व इतर ठिकाणच्या वृक्षांची छाटणी करणे, ड्रेनेज लाइन सफाई व गाळ काढणे, घनकचरा रोजच्या रोज उचलणे, शहरातील अधिकृत व अनधिकृत होर्दिंग्सची शहानिशा करून अनधिकृत व असुरक्षित होर्द्दिंग्स वर तत्काल कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच खारघर सेक्टर-5 येथील कावेरी सोसायटीची भिंत पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेली आहे ती भिंत लवकरात लवकर बांधून पूर्ण करावी. पनवेल महानगरपालिका अंतर्गत पावसाळापूर्वीची कामे युद्ध पातळीवर पूर्ण करणे आवश्यक व गरजेचे आहे तसेच पावसाळा पूर्वीची कामे करण्यात हलकर्जीपणा करणार्‍या ठेकेदार व ामे पूर्ण करून घेण्यासाठी नेमलेला अधिकार्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी. अन्यथा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेच्या माध्यमातून जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरत पाटील, महानगर समन्वयक दिपक घरत, महानगर प्रमुख अवचित राऊत, पनवेल शहर प्रमुख प्रवीण जाधव, खांदाकॉलनी शहर प्रमुख सदानंद शिर्के, कळंबोली शहर प्रमुख सूर्यकांत म्हसकर, कामोठे शहर प्रमुख रामदास गोवारी, तळोजा शहर प्रमुख प्रदीप केणी, शहर संघटक संतोष गोळे, विभाग प्रमुख नंदू घरत, गणेश खांडगे उपस्थित होते.
फोटो ः शिवसेनेतर्फे महानगरपालिकेवर धडक व मागण्यांचे निवेदन
Comments