प्रितम म्हात्रे यांनी जपली सामाजिक बांधिलकी "नुकसानग्रस्त घरांसाठी जे.एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचा मदतीचा हात"...
प्रितम म्हात्रे यांनी जपली सामाजिक बांधिलकी
"नुकसानग्रस्त घरांसाठी जे.एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचा मदतीचा हात"...
       
पनवेल / प्रतिनिधी : - 
गेले काही दिवस रायगड जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर केला होता. यादरम्यान पनवेल उरण परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. ज्यामुळे सामान्य नागरिकांसोबत ग्रामीण भागातील शेतकरी सुद्धा हवालदिल झाला होता.  
        दोन दिवसांपूर्वी मुसळधार वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीमुळे उरण मधील सारडे गावात काही घरांची वाताहात झाली. घर आणि शेतामध्ये पाणी घुसले, काही घरांचे कौल आणि पत्रे सुद्धा सोसाट्याच्या वाऱ्यामुळे उडून गेले. यासंदर्भात स्थानिक प्रशासनाकडून काही ठिकाणी पाहणी करण्यात आली. 
           शासनाकडून योग्य तो पाठपुरावा करून त्यांना सहकार्य मिळेलच परंतु आपणही समाजाचे काही देणं लागतो या भावनेतून श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून मा.नगराध्यक्ष श्री जे एम म्हात्रे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एक माणुसकीचा हात म्हणून मा.नगरसेवक गणेश कडू, मा.सरपंच  जितेंद्र म्हात्रे, रामेश्वर आंग्रे, मंगेश अपराज  यांनी दुर्घटनाग्रस्त भागातील घरांची पाहणी केली. दुर्घटनाग्रस्त रहिवासीयांची भेट घेऊन शासनाकडून योग्य तो मोबदला मिळवून देण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू असे आश्वासन दिले. सामाजिक बांधिलकीतून जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून तातडीचे अर्थसहाय्य देऊन त्यांना मदत केली.
 यावेळी सारडे गावातील शेखर पाटील यांच्यासोबत ग्रामस्थ उपस्थित होते.

कोट
नैसर्गिक आपत्ती कधीही येऊ शकते अशावेळी शासन नागरिकांसोबत असतेच परंतु शासनाप्रमाणे आपणही आपल्या बांधवां सोबत उभे राहून सामाजिक बांधिलकी जपावी अशी शिकवण मला नेहमीच श्री.जे एम म्हात्रे साहेबांकडून मिळाली आहे. त्याचेच मी आणि माझे सहकारी नेहमीच अनुकरण करत असतो. यापुढेही आवश्यक त्या वेळी आमची जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्था नेहमीच दुर्घटनाग्रस्त बांधवांच्या सोबत राहील 

प्रितम जनार्दन म्हात्रे 
मा.अध्यक्ष 
जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्था.
Comments