वपोनि हनीफ दस्तगीर मुलानी यांना ३० वर्षे सेवेत सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल पोलीस पदक..
वपोनि हनीफ दस्तगीर मुलानी यांना ३० वर्षे सेवेत सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल पोलीस पदक

पनवेल वैभव, दि.1 (संजय कदम) ः गुन्हे शाखा कक्ष 3 चे वपोनि हनीफ दस्तगीर मुलानी यांना 30 वर्षे सेवेत सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावली म्हणून पोलीस पदक प्रदान करण्यात आले.
ते मुळचे वडगांव जयराम स्वामी जिल्हा सातारा येथील रहिवासी असून त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण कराड येथे पूर्ण केल्या नंतर ते पोलिस खात्यात रुजू झाले त्यांनी आज अखेर मुबई,आयुक्तालय ठाणे आयुक्तालय नवी मुंबई आयुक्तालय येथे विविध पोलिस ठाणे येथे कर्तव्य बजावले आहे. विशेष करून तालुका पनवेल येथे कर्तव्य बजावत असताना बेल्जियम नागरिक यास कर्नाळा खिंड येथे मारहाण करून लुटण्यात आले होते तो गुन्हा उघडकीस आणून त्यास 15 दिवस उपचार करून बेल्जियम येथे  पूर्तता करून सुखरूप परत केले त्या बद्दल त्या वेळी  बेल्जियम एम्बेसी कडून कौतुक झाले होते. त्यांनी खून, दरोडे,गंभीर गुन्ह्याचा उत्कृष्ट तपास केला असून  कायदा सुव्यस्था ही उत्तम प्रकारे  सांभाळली आहे.
खारघर येथील बँक दरोडा 24 तासात उघडकीस आणून सर्व आरोपी अटक केले याबद्दल तत्कालीन पोलीस आयुक्त  यांनी 10,000 रुपये बक्षिस दिले होते. 2009 लोकसभा वेळी तालुका पनवेल येथे कार्यरत असताना कोन पोयंजे येथे लोकांमध्ये जागृती करून एकही गुन्हा न होऊ दिल्याने त्यावेळी त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात आले होते. जनमाणसात त्याची कर्तबगार, प्रामाणिक  अशी चांगली प्रतिमा असून त्यांना मिळालेल्या या पदक मुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
फोटो ः हनीफ मुलानी पदक स्वीकारताना
Comments